भोर तालुक्यातील नसरापूरच्या मेनआळी गावावर भूस्खलनाची टांगती तलवार, भोर तहसीलदारांनी भेट देत अधिकाऱ्यांना केल्या सूचना

भोर,पूणे ३ ऑगस्ट २०२३ : नसरापूर येथील मेनआळीवर भूस्खलनाची टांगती तलवार उभी असून, ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली जगत असल्याबाबतची माहिती समजताच तहसीलदार सचिन पाटील यांनी भेट देत येथील रहिवाशांचे स्थलांतर करण्यासाठी पर्यायी जागा व नदीकिनारी संरक्षक भिंत उभारणीसाठी कार्यवाही करण्याच्या स्थानिक प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.

नसरापूर ग्रामपंचायत हद्दीत शिवगंगा नदीकिनारी वसलेल्या धोकादायक मेनआळीचे माळीण होणार? अशी भीती नागरिकांना वाटत आहे. या पार्श्वभूमीवर भोरचे तहसीलदार सचिन पाटील यांनी या तातडीने पाहणी केली. या वेळी मंडलाधिकारी प्रदीप जावळे, सरपंच सपना झोरे, संतोष कदम, बाजार समीतीचे माजी संचालक ज्ञानेश्वर झोरे, पिंटू वाल्हेकर आदी उपस्थित होते.

तहसीलदार सचिन पाटील यांनी घटनास्थळावर भेट देऊन शिवगंगा नदी पुलावरून पाहणी केली. यावेळी उंच जमिनींची झीज होऊन मातीच्या कोसळणाऱ्या कडा व पुराच्या तडाख्याने धक्का बसलेल्या घरांना तडे गेल्याचे निदर्शनास आले. यावेळी पाटील यांनी धोकादायक स्थितींत राहत असलेल्या रहिवाशांना तात्काळ पर्यायी जागेत राहण्याच्या नोटीसा द्या, अशा ग्रामपंचायतीला सूचना केल्या आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा