लता मंगेशकर यांच्यावर झाला विषप्रयोग…!

10

मुंबई, २८ नोव्हेंबर २०२०: संपूर्ण जगाला आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणारी संगीतातील गानसम्राज्ञी या नावाने प्रसिद्ध आसणारी प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्या विषयी एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांना आणि बाॅलिवूड सृष्टीला एक धक्का बसला आहे.

भारतरत्न गायिका लता मंगेशकर यांच्यावर १९६२ मधे विषप्रयोग करण्यात आला होता. १९६२ मध्ये लता दीदी यांना ‘बीस साल बाद’ सिनेमासाठी एक गाणं रेकॉर्ड करायचं होतं. त्यासाठी संगीत दिग्दर्शक हेमंत कुमार यांनी पूर्ण तयारी केली. परंतु रेकॉर्डिंग करण्याच्या काही तास आधी लतादीदींची तब्येत अचानक बिघडली. सकाळपासूनच त्यांच्या पोटात दुखू लागलं. सतत उलट्या होऊ लागल्या. त्यांची तब्येत एवढी खालावली की त्यांना हलताही येऊ शकत नव्हतं.

तब्येत ढासाळल्या नंतर लता दिदींना रूग्णालयात हालवण्यात आले जिथे त्यांनी ३ दिवस मृत्यूशी झुंज दिली आणि १० दिवसानंतर त्यांची प्रकृती ठीक होत आसताना डाॅक्टरांनी त्यांच्यावर जेवणातून विषप्रयोग झाल्याची धक्कादायक गोष्ट सांगितली. तर आश्चर्य म्हणजे तेव्हा पासूनच त्यांचा अचारी देखील गायब झाला.

लता दिदीं विषयी…..

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भारतात ओळखत नाही अशी एकही व्यक्ती सापडणार नाही.. फक्त भारतातच नाही तर त्यांच्या गायनाचे जगभरात कोट्यवधी लोक आहेत. त्यांनी आतापर्यंत शेकडो हिंदी सिनेमांमध्ये आणि मराठी, बंगाली, आसामी यांसह ३६ प्रादेशिक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. २८ सप्टेंबर १९२९ रोजी जन्मलेल्या लता मंगेशकर यांचं मूळ नाव हेमा मंगेशकर आहे. भारतातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या भारतरत्न पुरस्कारानेही त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

या घटनेनंतर लता मंगेशकर या कधीच गाऊ शकणार नाही आश्या आफवा पसरू लागल्या ज्यावर लता दिदींनी स्पष्टीकरण दिले. दीदी म्हणाल्या की,’या प्रकरणाबद्दल आम्ही मंगेशकर फारसं बोलत नाही. कारण आमच्यासाठी तो फारच वाईट काळ होता. पण मी गाऊ शकणार नाही असं डॉक्टरांनी कधीच सांगितलं नाही. या सगळ्या अफवाच आहेत. उलट माझे डॉक्टर आर.पी कपूर यांनी उत्तमरित्या माझ्यावर उपचार केले. मी लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभी रहावी म्हणून सर्वतोपरि प्रयत्न केले. पण’ इतकी वर्ष या घटनेबद्दल उठणाऱ्या अफवांवर मी सांगू इच्छिते की त्या प्रकरणानंतर मी माझा आवाज गमावला नाही.’

याउलट या घटनेनंतर जेव्हा लता मंगेशकर यांनी गाण्याचा निर्णय घेतला तेव्हा हेमंत कुमार यांनी त्यांना पहिलं गाणं देऊ केलं. याबद्दल बोलताना लता दीदी म्हणाल्या की, ‘एक दिवस हेमंतजी माझ्या घरी आले होते. मला गाऊ देण्यासाठी माझ्या आईची परवानगी घ्यायला ते आले होते. तसेच गाणं गाताना मला त्रास होत आहे असं जाणवलं तर ते लगेच मला घरी सोडतील.’ यानंतर त्यांनी बीस साल बाद या सिनेमातील ‘कही दिप जले कहीं दिल’ हे गाणं गायलं. या गाण्याला फिल्मफेअरचा पुरस्कारही मिळाला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे