गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा लातूर जिल्ह्यात अन्नातून विषबाधा; एका मुलीचा मृत्यू

लातूर जिल्ह्यात अन्नातून विषबाधा; एका मुलीचा मृत्यू

लातूर, दि.२६ मे २०२० : निलंगा तालुक्यातील नदीहत्तरगा येथील एकाच कुटुंबातील तीन बालकांना अन्नातून विषबाधा होऊन एका बारा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

रविवार (दि. २४) च्या मध्यरात्री नदीहत्तरगा येथील सिंकदर सुर्यवंशी यांच्या दोन मुली व एका मुलाला जुलाब,उलट्यांचा त्रास जाणवू लागला. सकाळी सोमवार (दि.२५) ला त्यांची परिस्थिती बिघडत चालल्याने त्यांना किल्लारी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तिथून त्यांना लातूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यातील दिव्या सिंकदर सुर्यवंशी (वय १२) या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर दोघांची प्रकृती स्थिर आहे.

त्या तीन मुलांना अन्नातून विषबाधा झाल्याचे प्राथमिक अहवाल समोर आला असून कोणीच घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे जेवरी प्राथमिक आरोग्य केंद्रातून सांगण्यात आले.

न्युज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version