‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानाला सुरुवात, कुंजीरवाडी येथे शुभारंभ

कुंजीरवाडी, दि. १५ सप्टेंबर २०२०: राज्य सरकारने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हे अभियान राज्यभर राबविण्याचे आवाहन केले आहे. सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जिल्हाभर हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप चांगलाच वाढत आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींनी ही मोहीम प्रभावी राबवावी, अशा सूचना आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिल्या आहेत.

शहराबरोबरच आता ग्रामीण भागातही परिस्थिती चिंताजनक होत आहे. ग्रामीण भागात कोरोना बाधितांच्या संख्येने मोठा आकडा गाठला आहे. या मोहिमेतून शहर, गाव, पाडे, वस्त्या, तांडे येथील प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. ज्येष्ठ व्यक्ती आजारी असल्यास उपचार आणि प्रत्येक नागरिकाला व्यक्तिश भेटून आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे. प्रशासनाला सूचना मोहीम कालावधीमध्ये गृहभेटी देण्यासाठी आरोग्य पथके तयार करण्यात आले आहेत. त्यात एक आरोग्य कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींनी दिलेले दोन स्थानिक स्वयंसेवक असतील. एक पथक दररोज ५० घरांना भेट देईल. भेटीदरम्यान घरातील सर्व सदस्यांचा ताप मोजतील. ‘कोमॉर्बिड’ आहे का याची माहिती घेतील जाईल व ताप, खोकला, दम लागणे, एसपीओ २ कमी अशी कोविडसदृश लक्षणे असणाऱ्या व्यक्तींना जवळच्या फीव्हर क्लिनिकमध्ये पाठवण्याचा येईल व कोमॉर्बिड रुग्ण नियमित उपचार घेतात का याची खात्री करतील.

प्रत्येक ५ ते १० पथकांमागे एक डॉक्टर उपचार व संदर्भ सेवा देतील. त्यानुसार कामकाज चालेल. कोमॉर्बिड रुग्णासाठी औषधांचा साठा रुग्णालय स्तरावर उपलब्ध करून देण्यात येईल. प्रत्येक तालुक्यात एक ताप उपचार केंद्र कार्यरत होणार आहे. आवश्यकतेनुसार कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलची निर्मिती करण्यात येईल. तिथे ऑक्सिजन पुरवठा पुरवण्यात येईल, या मोहिमेंतर्गत राबविण्यात येणार आहे. कलेक्टर देशमुख यांनी कुंजीरवाडी गावात स्वतः नागरिकांची टेस्ट करून धाकवले व अभीयान चालू केले. पुणे जिल्हाधिकारी राज देशमुख यांनी कुंजीरवाडी येथे माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानाचा शुभारंभाच्या वेळेस बोलताना सांगितले आहे.

यावेळी पुणे जिल्हाधिकारी राज देशमुख, शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार, हवेली उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, हवेली तालुका आरोग्य अधिकारी सचिन खरात, पंचायत समिती गट विकास अधिकारी प्रशांत शिर्के, नायब तहसीलदार संजय भोसले, व सर्कल, कुंजीरवाडीच्या सरपंच सुनिता धुमाळ, ग्रामपंचायत व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा