पुण्यात पीव्हीआरच्या एक्स्ट्रा लार्ज स्क्रिनचं लॉन्च… 4DX तंत्रज्ञानाची स्क्रीन आता प्रेक्षकांसाठी

पुणे, २६ सप्टेंबर २०२२: पीव्हीआर हे सध्या सर्व देशात लहान-मोठ्या सगळ्यांचे लाडके सिनेमा घर. 2D आणि 3D नंतर आता 4DX असलेला सर्वात मोठ्या स्क्रीनचे पुण्याच्या हिंजवडी फेज २ मध्ये लॉन्चिंग झाले. पुण्यातील सर्वात मोठ्या स्क्रिनला आज सुरुवात झाली.

पाच प्रिमिअम ऑडिटोरिअम आणि ६ स्क्रीनने अद्ययावत असलेल्या या मॉलमध्ये संपूर्ण अद्ययावत तंत्रज्ञान अवगत आहे. या स्क्रीनच्या ऑडिटोरिअममध्ये १२४४ आसनांची व्यवस्था असून सेलिब्रिटी रिक्लायनर्स, सेल्फ तिकिटींग किओस्क, ४ के लेझर प्रोजेक्शन, डॉल्बी अटमॉस साऊंड व रीअल डी-३डी स्क्रीन उपलब्ध आहे.

आकर्षक चित्रे, प्रबळ साऊंड आणि लक्षवेधक ३डी यामुळे चित्रपट पाहताना तो अतिशय लक्षणीय वाटेल, अशी रचना या ऑडिटोरिअममध्ये करण्यात आली आहे. बेंगळूर, चेन्नई, कोलकत्ता, मुंबई, सुरत, नोएडा, दिल्ली नंतर आता पुण्यातली हा पहिली अद्ययावत स्क्रीन आहे.

यावेळी बोलताना पीव्हीआर लिमिटेडचे मुख्य अधिकारी गौतम दत्ता यांनी सांगितले की, चित्रपट दिवसेंदिवस प्रगल्भ होत आहेत. चित्रपटाला अनुभवात्मक बनवण्यासाठी पहिली पीएक्सल स्क्रीन आणल्यानंतर प्रेक्षकांना चित्रपटाचा पूरेपूर रोमहर्षक आनंद घेता येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या एकूण स्‍वरूपामध्‍ये अधिक उत्‍साहाची भर म्‍हणून फोयर सिलिंगवरील सतत असलेली मोठी एलईडी स्क्रीन, ‘व्‍ही’ थीमसह अनेक फ्रेम केलेल्‍या सानुकूल कलाकृती, हॉलिवुड, तसेच भारतीय सिनेमाचे दिग्‍गज कलाकार व अभिनेत्रींचा सन्‍मान यांचा समावेश आहे. सिनेमा विविध ग्राहकांच्या आवडीनिवडी पूर्ण करणार्‍या गॉरमेट स्वादिष्ट पदार्थांची विस्तृत श्रेणी देईल.

सध्याच्या काळात सिनेमा हा विरंगुळा आणि चैनीची गोष्ट झाली आहे. त्यामुळे आता जास्तीत जास्त प्रेक्षक अद्ययावत तंज्ञज्ञानामुळे या ऑडिटोरिअममध्ये येतील, असा विश्वास पीव्हीआरकडून व्यक्त केला जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा