लोणी काळभोर, दि. ११ जून २०२०: येथे ता. १० जून २०२० रोजी कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातले आहे. भारतातही करोनाग्रस्तांची संख्या वाढू लागल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. करोना विषाणूची लागण होण्याच्या भीतीने भारतीयांमध्ये चिंतेचे वातावरण दिसत आहे. ही भीती दूर सारून नवचैतन्य निर्माण व्हावे यासाठी प्रसिद्ध संगीतकार आणि गायक रुपकुमार राठौड आणि प्रसिद्ध गायिका रिवा राठौड यांनी संगीतबद्ध केलेले गाणं ‘जगमगाएगा मेरा इंडिया’ याचे नुकतेच एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, राजबाग, लोणी काळभोर तर्फे सोशल माध्यमांवर लाँच करण्यात आले.
यावेळी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, एमआयटीच्या कार्यकारी संचालिका प्रा. ज्योती कराड-ढाकणे, एमआयटी संगीत कला अकादमीचे सचिव आदिनाथ मंगेशकर, एमआयटी फाईन आर्ट्स आणि विश्वशांती संगीत कला अकादमीचे अधिष्ठाता प्रा. डॉ. मिलिंद ढोबळे आदी उपस्थित होते.
कोराना व्हायरसने संपूर्ण मानवी जीवनावरच प्रभाव टाकला आहे. या कठिण काळातही रोग्यांची सेवा करणारे डॉक्टर आणि वैद्यकीय सेवेतील कर्मचारी आपली सेवा तत्परतेने देत आहेत. देशातील संपूर्ण कोरोना योद्धांसाठी आणि युवकांसाठी समर्पित ‘जगमगाएगा मेरा इंडिया’ हे गाणं प्रसिद्ध संगीतकार आणि गायक रुपकुमार राठौड आणि रिवा राठौड यांनी गायले आहे.
कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या संकटामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण पसरत आहे. या महामारीचा सर्वाधिक फटका अर्थव्यवस्थेला बसत आहे. या कठीण परिस्थितीतून युवा पिढीला नवी उमेद मिळावी. त्यांच्याकडून सक्षम भारताचा उभारणी व्हावी हा या गाण्यामागचा मुख्य उद्देश आहे. हे गाण प्रसिद्ध संगीत लेखक चिंतन पारिख यांनी लिहले आहे. तसेच बिनॉय गांधी यांनी व्हिडिओ एडिटिंग केले आहे. सुनाली राठौड यांनी याचे दिग्दर्शन केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे