Galaxy S22 Ultra लाँच, 11 फेब्रुवारी 2022: दक्षिण कोरियातील तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज सॅमसंगने आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन Galaxy S22 Ultra लॉन्च केला आहे. कंपनीने आपल्या मेगा इव्हेंट अनपॅक्ड 2022 मध्ये S22 Ultra सह अनेक स्मार्टफोन आणि टॅब्लेट लॉन्च केले आहेत.
सॅमसंगने आपल्या मेगा इव्हेंट गॅलेक्सी अनपॅक्ड 2022 मध्ये Galaxy S22 Ultra लाँच केला आहे. या स्मार्टफोनसोबत Galaxy S22 आणि Galaxy S22 Plus देखील लॉन्च करण्यात आले आहेत.
Galaxy Note मालिकेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गॅलेक्सी नोट सीरीजचे फीचर्सही या स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहेत. यासोबत एस पेन स्टायलसचा सपोर्ट उपलब्ध आहे. S Pen ला IP68 रेटिंग मिळाली आहे, याचा अर्थ हा फोन वॉटर प्रूफ देखील आहे. म्हणजेच पावसातही तुम्ही हा फोन वापरू शकता.
Galaxy S22 Ultra मध्ये 6.8-इंचाचा Edge QHD+ डिस्प्ले आहे. डिस्प्ले पॅनल SuperAMOLED आहे आणि त्यात 120Hz रिफ्रेश रेटसाठी सपोर्ट आहे. टॅच सॅम्पलिंग रेट 240Hz आहे.
Galaxy S22 Ultra मध्ये 4nm चिपसेट देण्यात आला आहे. तथापि, लॉन्च दरम्यान, कंपनीने हे सांगितलं नाही की यात Qualcomm Snapdragon 8 Gen 1 चिपसेट असेल किंवा कंपनीचा इन-हाउस प्रोसेसर देण्यात आला आहे.
Galaxy S22 Ultra मध्ये 12-मेगापिक्सेलची अल्ट्रा-वाइड लेन्स आहे. 108 मेगापिक्सेल वाइड कॅमेरा आहे. याशिवाय 10 मेगापिक्सलचे दोन टेलीफोटो लेन्स देण्यात आले आहेत. यामध्ये 3X आणि 10X ऑप्टिकल झूमसाठी सपोर्ट आहे.
कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 100X स्पेस झूमचा सपोर्ट दिला आहे. सेल्फीसाठी, Galaxy S22 Ultra मध्ये 40-megapixel फ्रंट कॅमेरा आहे.
Galaxy S22 Ultra चार प्रकारांमध्ये येतो. बेस व्हेरिएंटमध्ये 8GB रॅमसह 128GB स्टोरेज आहे, तर दुसऱ्या व्हेरिएंटमध्ये 12GB रॅमसह 256GB स्टोरेज आहे. तिसऱ्या व्हेरिएंटमध्ये 12GB रॅमसह 512GB स्टोरेज आहे. टॉप व्हेरिएंटमध्ये 12GB रॅमसह 1TB स्टोरेज मिळेल.
Galaxy S22 Ultra मध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. वायरसह 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे, तर 15W वायरलेस चार्जिंग पर्याय आहे. यासह, इतर फोन देखील वायरलेस चार्ज करण्यास सक्षम असतील.
हा स्मार्टफोन Android 12 आधारित One UI 4.1 वर चालतो. सॅमसंगच्या नवीनतम स्मार्टफोन्सना चार वर्षांसाठी सॉफ्टवेअर अपडेट्स मिळतील, असं आश्वासन कंपनीनं दिलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे