सोलापूरात कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी टेली आयसीयू प्रणालीसह विविध उपाय योजना सुरू

सोलापूर, १९ सप्टेंबर २०२० :
सोलापूर जिल्ह्यात आता पर्यंत जवळपास सव्वा २ लाख जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून त्यापैकी २७ हजारांपेक्षा जास्त जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं आढळून आलं आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या कोरोना परिस्थितीचा आमच्या प्रतिनिधीनं घेतलेला हा आढावा.

सोलापूर जिल्ह्यातील जवळपास १९ हजार रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या सव्वा ७ हजार रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. या आजारामुळे जिल्ह्यातील नऊशेहून जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा प्रशासन राबवत असलेल्या विविध उपाय योजनांमुळे कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावाला आळा बसला आहे. जिल्ह्यातील मृत्यू दर कमी करण्यासाठी मुंबई पुणे दिल्ली इथल्या तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घेवून रुग्णांना उपचार देण्यासाठी प्रशासनानं टेली आयसीयु प्रणाली सुरु केली आहे.

सोलापूरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयांत स्वंतत्र कोव्हीड रुग्णालयही सुरु करण्यात आलं आहे. या काळात मनुष्यबळ कमी पडू नये यासाठी कंत्राटी भरती करण्यात येणार आहे. तसंच खाजगी रुग्णालयात वाढीव बिलं आकारण्याच्या तक्रारी वाढल्याने त्या ठिकाणी बिलं तपासण्यासाठी शासकीय लेखा परिक्षकांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत.

ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या अस्थापना जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतल्या आहेत. कोरोना प्रादुर्भाव कमी करण्याच्या कामासाठी आणखी ५० लाख रुपयांची मदत शासनाकडे मागितली असल्याची माहिती संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा