टिक-टॉकची तरुणाईमधील क्रेझ लक्षात घेऊन, टिक-टॉकला टक्कर देण्यासाठी लवकरच गुगलचे नवे अॅप येणार आहे.
गुगल अमेरिकेतील लोकप्रिय सोशल व्हिडीओ शेअरिंग अॅप ‘फायरवर्क’ खरेदी करण्याच्या प्रयत्नात आहे. गुगलबरोबरच चीनची मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईट Weibo सुद्धा फायरवर्क खरेदी करण्याच्या विचारात आहे. मात्र, फायरवर्क खरेदी करण्याच्या शर्यतीमध्ये गुगल इतर कंपन्यांच्या पुढे आहे.
फायरवर्कने गेल्या महिन्यात भारतात एन्ट्री केली आहे. फंड रेजिंगमध्ये फायरवर्कला या वर्षाच्या सुरूवातीला 100 मिलियन डॉलर नफा मिळाला आहे. फायरवर्क लूप नाउ टेक्नॉलॉजीच्या मदतीने तयार केलेल्या अॅप्सचा एक भाग आहे.
शॉर्ट व्हिडिओ मोकिंग व शेअरिंगसाठी असलेले हे अॅप टिक-टॉकपेक्षा वेगळे आहे. फायरवर्क युजर्स 30 सेकंदाचा व्हिडीओ बनवू शकतो. टिक-टॉकमध्ये 15 सेकंदापर्यंत व्हिडिओ बनवता येतो.
व्हर्टिकल व हॉरिजॉन्टल व्हिडीओसुद्धा शूट करता येते. फायरवर्क अॅप अँड्रॉईड व IOS युजर्ससाठी उपलब्ध आहे. हे अॅप वापरणाऱ्या युजर्सची संख्या 10 लाखांपेक्षा जास्त आहे.