कोरेगाव भीमा, दि.२८ एप्रिल २०२०: देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना महाराष्ट्र राज्यात कर्तव्यावर असणारे पोलीस, डॉक्टर, नर्स, आशाताई, सफाई कामगार यांच्यावर समाजकंटक हल्ला करत आहेत. हल्ला करणाऱ्या समाजकंटकांचे राज्यातील वकील बांधवांनी वकीलपत्र घेऊन नये असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधी विभागाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष ॲड. गणेश म्हस्के यांनी केले आहे.
देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना महाराष्ट्र राज्यात कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस, डॉक्टर, नर्स, अाशाताई, सफाईकामगार यांच्यावर दिवसेंदिवस समाजकंटकांकडून हल्ल्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. नागरिकांच्या सेवेत अहोरात्र कार्यरत असणारे डॉक्टर, पोलीस व सेवेमध्ये असणाऱ्या अन्य घटकांवर होणारे हल्ले ही बाब अतिशय निंदनीय आहे. समाजकंटकांच्या मनात कायद्याबद्दल धाक राहिला नाही. त्यामुळे अशा घटना रोकण्यासाठी व आरोपींच्या मनात कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी राज्यातील वकील बांधवांनी समाजकंटकांचे वकीलपत्र घेऊ नये असे आवाहन ॲड. गणेश मस्के यांनी केले आहे. समाजकंटाकांकडून होत असलेल्या हल्ल्यांचा नवनिर्माण सेनेने तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी -ज्ञानेश्वर शिंदे