प्राचीन काळी आर्यांचे वास्तव्य उत्तर ध्रुव प्रदेशात होते. त्या काळापासून दिवाळी सण वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. दिवाळीत अश्विन वद्य चतुर्दशी अर्थात, नरक चतुर्दशीला अभ्यंगस्नानाला विशेष महत्त्व आहे.
अभ्यंगस्नान म्हणजे नक्की काय सूर्योदयापूर्वी उठून संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून, सुवासिक उटणे लावून केलेले स्नान म्हणजे अभ्यंगस्नान होय.
नरक चतुर्दशी का साजरी करतात? : भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा या दिवशी वध करून मानवजातीला राक्षसी वृत्तींच्या बंधनातून मुक्त केले होते. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो.
दीपदानाचे महत्त्व या दिवशी दीपदान करण्याची (पणती लावण्याची) प्रथा आहे. पणती हे अज्ञानाचा अंध:कार दूर करण्याचे आणि तेज, समृध्दी यांचे प्रतीक असल्याने दीपदानाचे महत्त्व आहे.
लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करुन, घरासमोर रांगोळी काढून, दारी झेंडूच्या माळा लावून, फराळाचा, लाह्या, बत्तास्यांचा नैवेद्य दाखवून लक्ष्मीपूजन केले जाते.
अशी करा पूजा लक्ष्मीपूजनाला पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात.
लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त: सायं. 6.06 ते रात्री 8.37 पर्यंत.