मुंबई, १७ ऑक्टोबर २०२० : अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दि.१९ ऑक्टोबर पासुन बारामतीतून सुरूवात करणार आहे. तीन दिवसात ते तीन जिल्ह्यांना भेट देणार आहेत.
राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने, अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. शेतकर्याना दिलासा देण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीपासून आपला दौरा प्रारंभ करणार आहेत.
कुरकुंभ, इंदापूर, टेंभूर्णी, करमाळा, परांडा या भागात फडणवीस दौरा करून उस्मानाबादकडे रवाना होणार आहेत. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या प्रवासानंतर दुसर्या दिवशी मंगळवार दि.२० ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद, लातूर, बीड आणि परभणी या जिल्ह्यातील ठिकाणांना ते भेटी देणार आहेत.
तिसर्या दिवशी म्हणजे बुधवारी दि.२१ऑक्टोबरला हिंगोली, जालना, औरंगाबादचा ते दौरा करतील. या तीन दिवसांत ९ जिल्ह्यांमध्ये सुमारे ८५० कि.मी.चा प्रवास फडणवीस करणार आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव