विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार पुणे दौऱ्यावर,शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि आमदार रवींद्र धंगेकर यांच्यातील नाराजी समोर

पुणे, ६ ऑगस्ट २०२३ : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची काही दिवसांपूर्वीच विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाली. या निवडीनंतर प्रथमच त्यांनी पुणे शहराचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांना पुणे शहर काँग्रेसमधील गटबाजी पाहायला मिळाली. पुणे काँग्रेसमध्ये दोन गट असल्याचे यानिमित्ताने समोर आले. शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि आमदार रवींद्र धंगेकर यांच्यात नाराजी असल्याचे समोर आले. त्यांच्या या दौऱ्यात नाराजीनाट्याची चांगलीच चर्चा रंगली.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आज पुणे दौऱ्यावर होते. ते पुण्यात येताच काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य सुरु झाले. विजय वडेट्टीवार पुणे काँग्रेस कार्यालयात जाणार होते. परंतु त्यांनी अचानक आमदार रवींद्र धंगेकर यांच्या कार्यालयात जाण्याचे ठरवीले. त्यानंतर त्यांच्या गाडीत असलेले शहराध्यक्ष अरविंद शिंदे नाराज झाले. ते विजय वडेट्टीवार यांच्या गाडीतून उतरले आणि थेट काँग्रेस कार्यालयात गेले. त्यामुळे वडेट्टीवार यांच्यासमोर रविंद्र धंगेकर गट आणि अरविंद शिंदे गटातील गटबाजी समोर आली.

अजित पवार यांनी अमित शाह हे महाराष्ट्राचे जावई असल्याचा उल्लेख आपल्या भाषणात केला होता. त्यावर विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. अजितदादा यांना पाच वर्षांपूर्वी अमित शाह महाराष्ट्राचे जावई होते, हे माहीत नव्हते का? आता अजित पवार यांना हा जावई शोध कसा लागला. अजित पवार सत्तेला सर्वोच्च मानतात. परंतु सत्तेला सर्वोच्च मानणाऱ्या नेत्यांना जनता बुडवल्याशिवाय राहणार नाही, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा