पुढाऱ्यांनी राजकारण न करता प्रशासनास मद्दत करा – एन के धपाटे

उरुळी कांचन, २८ ऑगस्ट २०२०: कोरोनाच्या महामारीला रोखण्यासाठी उरुळी कांचन येथील राजकीय पुढारी यांनी सर्वांनीच एकत्रित येऊन प्रशासनाला सहकार्य करून कोरोनाला आपण हरवू या तसेच सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून आपल्या गावात कोरोनाला हद्दपार करू असे मत उरुळी कांचनचे प्रशासक एन. के .धापटे यांनी व्यक्त केले. उरुळी कांचनच्या सरपंच पदाची मुदत संपल्याने शासनाने प्रशासक म्हणून धापटे यांची नियुक्ती केली आहे.

त्यांनी कारभार हाती घेतला असून आज ग्रामपंचायती मध्ये बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे स्व ईच्छेने गाव तीन दिवस बंद ठेवावे अशी मागणी केली. यावेळी मंडल अधिकारी दीपक चव्हाण, तलाठी प्रदीप जवळकर, ग्राम विकास अधिकारी वाय. जे. डोळस, जिल्हा परिषद सदस्य कीर्ती कांचन, पंचायत समिती सदस्य हेमलता बडेकर, तंटामुक्ती अध्यक्ष अमित कांचन, मा. सरपंच दत्तात्रय कांचन, मा. उपसरपंच भाऊसाहेब कांचन, रामभाऊ तुपे मा. प्राथमिक आरोग्याच्या अधिकारी डॉ. सुचेता कदम, मा. सरपंच राजश्री वनारसे लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन चौधरी, अनेक व्यापारी वर्ग व पुढारी व नागरिक उपस्थित होते.

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचारी व डॉक्टर हे कोरंटाईन करण्यास गेले असता त्यांना अनेक ठिकाणी दमदाटीचा सामना करावा लागत असल्याची माहिती यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डाॅ. सुचेता कदम यांनी सांगितले. या बैठकीच्या वेळी अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी आरोग्य सेवेला टार्गेट केले आहे. पण आरोग्य अधिकारी डॉ. सुचेता कदम यांनी प्रश्नाला उत्तर देत सांगितले की कोरंटाईन करण्याची जबाबदारी ही ग्रामपंचायतीची असून गावात अनेक नागरिक बिना मास्क फिरत आहेत व दुकानदार बिना मास्क मालाची विक्री करत आहेत यासाठी ग्रामपंचायतीने कडक पावले उचलण्याची गरज होती बाहेरील व्यक्तींच्या संपर्कामुळे उरुळी कांचन येथील कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. असे ही डाॅ. कदम यांनी सांगितले.

मा उपसरपंच भाऊसाहेब तुपे यांनी सांगितले की स्वैब देऊन आलेला रुग्ण निसर्ग उपचार आश्रम येथे ठेवावा. नंतर पाँझीटिव्ह व निगेटीव्ह रिपोर्ट आल्यावर त्याची व्यवस्था करावी. बैठकीमध्ये अनेक पुढाऱ्यांनी तीन दिवस गाव बंदची हाक दिली असून याला कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यांनी पाठिंबा दिलेला नाही. याविषयी बोलताना रामभाऊ तुपे यांनी सांगितले की ७९ टक्के मोलमजूरी करणारे या गावात असून त्यांचं काय ? व शेतकऱ्याला कोण वाली आहे का नाही? अशी विचारणा करण्यात आली आहे. लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन चौधरी, यांनी सांगितले की आम्ही ज्या वेळी विना मास्क संबंधी कारवाई केली त्यावेळी आम्हाला गावातील राजकीय पुढाऱ्यांनी फोन करून कारवाई थांबवण्यास सांगितले आहे. यापुढे कारवाई करायची असेल तर आम्हाला गावातील कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांचा हस्तक्षेप नको आहे. या गाव बंदीच्या हाकेला अनेक व्यापाऱ्यांनी विरोध केला असून , जर तीन दिवस गाव बंद ठेवून कोरोना जर कमी होत असेल तर मी गावातील व्यापाऱ्यांना सहा दिवस गाव बंद ठेवण्याची विनंती करेन असा टोला कस्तुरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद मेमाने यांनी लगावला आहे.

ते पुढे म्हणाले की, गाव बंद ठेवून सामान्य नागरिकांचे हाल होत असून गाव बंदीच्या ऐवजी एक ठराविक टाइमिंग देऊन मास्क व नियम पाळण्यास ग्रामपंचायतीने सांगावे व नियम न पाळणाऱ्यावर कडक कारवाई करावी याविषयी तंटामुक्तीचे अध्यक्ष अमित कांचन यांनी सांगितले की आरोग्य कर्मचाऱ्यांना किती कष्टाचे काम करावे लागत असल्याची माहिती त्यांनी दिली. पंचायत समिती सदस्य हेमलता बडेकर यांनी सांगितले की निसर्गोपचार आश्रम हे क्वारंटाईन सेंटर चालू करण्यासाठी निधी उपलब्ध नसून हे प्रकरण तसेच राहिले आहे. व उरुळी कांचन परिसरातील घरगुती कार्यक्रमाला बंदी आणावी व त्यामुळे रुग्ण संख्येत वाढ होत आहे. तीन दिवस गाव बंदच्या हाके बाबत नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा