मित्रानों आपल्यातील अनेकांना मेथीची भाजी आवडतच असेल. काही मित्र याला अपवाद असतील ही पण मेथीची भाजी हि खाण्यासाठीच नव्हे,तर तिचे अनेक गुणकरी फायदे आहेत. जे क्वचितच लोकांना माहिती असतील म्हणून आज आपण या पाले भाजीची वेगवेगळी गुणकरी फायदे पाहणार आहोत. चला तर जाणून घेऊ मेथीची भाजी खाण्याचे फायदे.
मेथीची भाजी चवीला कडू असते पण मेथीच्या भाजीत अनेक उपयुक्त पोषकतत्वे असतात मेथीच्या पानांमध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस आणि प्रथिने, व्हिटॅमिन जास्त प्रमाणात आढळतात.मेथीच्या पानांची पालेभाजी नुसती रुचकरच नव्हे, तर अनेक विकारांचा धोका कमी करणारी आहे.
त्वचा,केस आणि पचनक्रियेत ही या भाजीचा महत्वाचा वाटा…..
केसांच्या समस्या कमी होतात. मेथीची पेस्ट केसांना लावल्यास अथवा मेथीचा आहारात वापर केल्यास केस अधिक काळे व चमकदार होतात. मेथीची पाने बारीक करा आणि आंघोळीच्या अर्धा तास आधी केसांना लावा, कोंडा लवकर संपेल. तोंड आले असल्यास, घसा बसला असल्याच मेथीची पाने भिजवलेल्या पाण्याने गुळण्या कराव्यात. त्यामुळे आराम मिळतो. सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे दाणे खाल्याने पोट साफ राहते. मेथीमध्ये फायबर्स मोठ्या प्रमाणात असल्याने पोट नियमित साफ होण्यास मदत होते. तसेच मेथीच्या भाजीच्या सेवनाने भूक सुधारते, पचनक्रिया सुधारते.
कर्करोग सारख्या आजारावर उपयुक्त….
मेथीच्या भाजीत असलेल्या अँन्टिऑक्सिडंट गुणधर्मामुळे कर्करोग, मधुमेह व उच्च रक्तदाब यांना प्रतिबंध होण्यास मदत होतो.तसेच गुणधर्मामुळे स्तनांच्या आणि आतड्यांच्या कर्करोगाला देखील मेथी प्रतिबंध करते. मेथीच्या भाजीतील गॅलॉक्टोमेनिन हा हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असणारा घटक असतो. मेथीची पाने भिजवून पेस्ट बनवून त्वचेवर लावल्यास त्वचा स्वच्छ व मऊ दिसते. मेथीच्या पानात चिकट पोषक घटक असतात, ज्यामुळे त्वचेला कोरडेपणापासून संरक्षण होते. मेथी बारीक करून पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावल्यास काळे डाग दूर होतात. मेथीची पाने चेह-या वरील सूज कमी करते.
त्या मुळे मित्रानों आत्ता आहरात आणि त्या बरोबरच या पैकी कोणत्याही विकरासांठी मेथीच्या भाजीचा नक्की वापर करा.
न्यूज अनकट प्रतिनिधी