AC चालु ठेवल्याने फ्लॅट जळून खाक

26

उत्तर प्रदेश, ३० ऑक्टोबर २०२२: उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा पच्छिम येथील हायराईज सोसायटीच्या सातव्या मजल्यावर रात्रीच्या वेळी अचानक आग लागली. ही आग लागल्याचे समजताच स्थानिक नागरिकांनी अग्निशामक दलाला दिली व स्थानिक पोलिस ही घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली.

ही आग AC मध्ये शॉर्टसर्किट झाल्याने लागली असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतू घरातील सर्व सामान जळून खाक झाले आहे. पोलिसांनी दीलेल्या माहितीनूसार, फ्लॅटचा मालक एसी चालू ठेवून घराबाहेर गेला होता. एसी बराच वेळ सुरु असल्याने त्यांचा स्टॉबिलयझर जळाला, त्यामुळे शेजारी ठेवलेल्या कपड्यांना आग लागली.

या आगीमुळे खिडकीचे पडदे, लाकडी साहित्य पुर्णपणे जळून खाक झाले आहे. फ्लॅट मालक बाहेरगावी जाताना एसी चालूच ठेवून गेल्याने ही घटना घडली असल्याचे येथील स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. अग्निशमक दलाने आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर