औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयात ‘आर्ट ऑफ बीइंग’वर व्याख्यान

योगी डिव्हाइन सोसायटीचे प.पू. राजू भाई ठक्कर, प्रकर्ष पिंगे यांच्यातर्फे प्रेरणा ट्रस्टला मदतीचा हात

पुणे, ३१ डिसेंबर २०२२ : प.पू. कांती काका शताब्दीनिमित्त ‘मैत्री सुमिरन पर्व’च्या अनुषंगाने योगी डिव्हाइन सोसायटी, पवई, मुंबई येथील संत सी.ए. प.पू. वशीभाई यांचे गुरुवारी (ता. २९) औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयात ‘आर्ट ऑफ बीइंग’वर व्याख्यान झाले. सदर व्याख्यानाचा विषय महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री. कुणाल चव्हाण यांनी सुचविला होता. या प्रेरणादायी व मार्गदर्शनपर भाषणात महाविद्यालयाचे जवळपास अडीचशे विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद व काहीतरी मिळाल्याचा भाव होता.

प्रारंभी संप्रदायाचे सत्संगी प.भ. दीपक भाई जहागीरदार यांनी प.पू. वशीभाईंचा थोडक्यात परिचय करून दिला. मग प.पू. वशीभाईंनी ‘आर्ट ऑफ बीइंग’ या विषयावर प्रेरणादायी (मोटिव्हेशनल) भाषण केले. त्यात ते म्हणाले, की सर्वसामान्यपणे शिक्षण जरूरीचे आहेच; पण त्याचबरोबर सामान्यज्ञान असणे अतिशय गरजेचे आहे. आपण भारतीय नागरिक असल्याकारणाने आपण देशाकरिता, समाजाकरिता काय करतो किंवा काय करायला पाहिजे हे महत्त्वाचे. जर श्रद्धेपोटी स्वामी समर्थांचे पन्नास हजार स्वयंसेवक येऊन जर औरंगाबादची स्वच्छता करू शकतात, तर त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपण का करू शकत नाही? हे विचार करण्यासारखे आहे.

औरंगाबादचे स्वामीनारायण हरी मंदिर, हिरण्यनगर येथील सत्संगी पीयूष हुरपडे, स्वप्नील वारके ही मुले आपल्या येथूनच मराठी माध्यमातून शिकून पुढे ‘आयआयटी’मध्ये शिक्षण घेऊन ‘यूएस’मध्ये नोकरी करून भारतात आली आहेत. त्यांनी त्यांच्या यशाचे श्रेय फक्त आणि फक्त सत्संगाला दिले.

यावेळी व्यासपीठावर प्राचार्य उल्हासजी शिऊरकर, प.भ. दीपक भाई जहागीरदार व सौ. चित्राताई जहागीरदार उपस्थित होते. त्याबरोबरच शुक्रवारी (ता. ३०) प्रेरणा ट्रस्ट या विकलांग मुलांच्या प्रशिक्षण केंद्रास योगी डिव्हाइन सोसायटीचे प.पू. राजू भाई ठक्कर व प्रकर्ष पिंगे यांनी भेट देऊन संस्थेस एट व्हीलचेअर व दोन तीनचाकी सायकली भेट दिल्या व पुढे संस्थेतर्फे शक्य त्या मदतीचे आश्वासन दिले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा