नेहरू विज्ञान केंद्र मुंबई तर्फे यू ट्यूबच्या माध्यमातून व्याख्यानांचे आयोजन

मुंबई, दि. २६ मे २०२०: नेहरू विज्ञान केंद्र, मुंबईने दिनांक  २७ व २८ मे २०२० रोजी  यूट्यूब चॅनेलवर  दोन अतिशय महत्त्वाचे लॉकडाऊन व्हर्च्युअल लेक्चर्स आयोजित केले आहेत. “द फुरी ऑफ सायक्लोन अम्फान” याविषयावर  श्री. राजीव नायर, माजी संचालक, भारतीय मेट्रोलॉजिकल विभाग, मुंबई,  दिनांक २७ मे रोजी दुपारी १२.३० वाजता व्याख्यान देतील.

तर दक्षिण अणुविद्यालय संशोधन संस्थेच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. अनिता सेनगुप्ता यांचे  “स्पेस एक्स मेडेन अस्रोनंट फ्लाईट” या विषयावर व्याख्यान दिनांक २८ मे २०२० ला सकाळी ९.३० ला आयोजित करण्यात आले आहे.

या दोन्ही व्याख्यानांचा लाभ विद्यार्थी आणि सामान्य जनतेने घ्यावा असे आवाहन शिवाप्रसाद एम. खेनेड, संचालक, नेहरू विज्ञान केंद्र, मुंबई, (भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय) यांनी केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा