लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे यांनी स्वीकारला पदभार

नवी दिल्ली : लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी लष्करप्रमुखपदाचा आज पदभार स्वीकारलाआहे. जनरल बिपीन रावत आज लष्करप्रमुख पदावरून निवृत्त झाल्यामुळे लेफ्टनंट जनरल नरवणे हे लष्करप्रमुखपदाचा पदभार स्वीकारला आहे.
लेफ्टनंट जनरल नरवणे हे मूळचे पुण्याचे असून ज्ञान प्रबोधिनी शाळेचे विद्यार्थी आहे. त्यांच्यावर आता देशाच्या सामरिक व्यवस्थापनात सर्वोच्च स्तरावर होणाऱ्या महत्वाच्या बदलांची अंमलबजावणी करण्याची मोठी जबाबदारी असणार आहे.
जनरल बिपीन रावत यांच्या निवृत्तीनंतर लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी आज भारतीय सैन्याच्या लष्करप्रमुखपदाचा पदभार स्वीकारला आहे. माजी लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्यानंतर मनोज नरवणे यांची सैन्यातील एक अनुभवी अधिकारी म्हणून ओळख होती. आज त्यांनी लष्करप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली आहेत.
आपल्या ३७ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये नरवणे यांनी लष्करातील विविध पदांवर आणि विविध भागांमध्ये काम केलं आहे. मनोज नरवणे राष्ट्रीय सुरक्षा अकादमी आणि भारतीय सैन्य अकादमीचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांची कारकिर्द १९८० मध्ये सुरू झाली. त्यांनी शीख लाइट इन्फेन्ट्रीच्या ७ व्या बटालियनमधून कार्याला सुरुवात केली.

युद्ध, शांतताकालीन काम आणि दहशतवादाने ग्रस्त असलेल्या क्षेत्रांमध्ये काम करण्याचा मनोज नरवणे यांना अनुभव आहे. त्यांना आत्तापर्यंत परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेना पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. यापूर्वी जनरल अरूणकुमार वैद्य यांनी लष्कर प्रमुखपद भुषवले होत. आता नरवणे हे देशाचे २८ वे लष्कर प्रमुख आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा