लेखन शैलीतील एक क्रांतिकारी पर्व “रेव्हरंट टिळक”

रेव्हरंट ना. वा. टिळक हे नाव आजकालच्या वाचनामध्ये फारसे येत नसले तरी मराठी साहित्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या समाजजीवनामध्ये त्यांनी निर्माण केलेला ठसा अजूनही अमीट असाच आहे.

रे. ना. वा. टिळक या नावाने शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी टाकलेल्या क्रांतीकारक पावलांमुळे संपूर्ण महाराष्ट्राचे समाजजीवन ढवळून गेले होते.

नारायण वामन टिळक यांचा जन्म वामनराव व जानकीबाई यांच्यापोटी ६ डिसेंबर १८६१ रोजी रत्नागिरी जिल्ह्यात करंजगाव येथे झाला. घरातील अस्थैर्य, वडिलांचा रागीट-तापट स्वभाव, आर्थिक चणचण यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी आल्या.

कल्याण, मोखाडा, नाशिक, राहुरी, अहमदनगर, पंढरपूर, नागपूर, राजनांदगाव (छत्तीसगड), वाई, महाबळेश्वर, सातारा अशा वेगवेगळ्या ठिकाणी ते सतत फिरत राहिले. प्रत्येक ठिकाणी नवे घर व प्रत्येक ठिकाणी वस्तूंची जमवाजमव करत ते जगत राहिले.

१९ फेब्रुवारी १८९४ च्या डायरीमध्ये त्यांनी आपला ख्रिस्ती धर्मकडे ओढा वाढत असल्याचे लिहिले आहे. त्यानंतर रायपूरलाही त्यांनी या ख्रिस्ती पुस्तकांचे वाचन कायम ठेवले.

ख्रिस्ती होण्यासाठी आपल्याला बाप्तिस्मा युरोपियन व्यक्तीने ब्राह्मणांमधून ख्रिस्ती झालेल्या व्यक्तीऐवजी रे. तुकाराम नथोजी यांनी द्यावा अशी विनंती टिळकांनी केली.

१० फेब्रुवारी १८९५ रोजी मुंबईतील भेंडीबाजारातल्या चर्चमध्ये त्यांचा बाप्तिस्मा झाला. यावेळेस भरपूर गर्दीही जमली होती.

१८४२ पासून नगरमध्ये ख्रिस्ती मिशनऱ्यांनी ‘ज्ञानोदय’ हे नियतकालिक सुरू केले होते. ना. वा. टिळकांनी १९००-१९१९ या कालावधीमध्ये या नियतकालिकाचे संपादक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांचे पुत्र देवदत्त यांनी अनेक वर्षे संपादनाचे कार्य पुढे नेले.

धर्मगुरू, ईश्वरपरिज्ञान महाविद्यालयामध्ये धर्मशिक्षक, कीर्तनकार, ‘ज्ञानोदय’चे संपादक, बिसेलबाईंच्या ‘बालबोधमेवा’मध्ये विशेष सहभाग, ‘देवाचा दरबार’चे संस्थापक, अशी विविध कामे करत असतानाच अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपदही टिळकांनी भूषवले.

९ मे १९१९ रोजी रेव्हरंड टिळकांचे मुंबईत निधन झाले. शिवडीतील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यविधी झाले. पण त्यांची नगरमध्ये चिरविश्रांती घेण्याची इच्छा होती. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या अस्थी नगरला आणून लाल टाकीजवळील दफनभूमीत पुरण्यात आल्या. नंतर त्यावर समाधी बांधण्यात आली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा