निरावागज येथे बिबट्याचा बोकडावर हल्ला

बारामती, दि. ३० जून २०२०: बारामती तालुक्यातील नीरावागज येथील पन्हाळे वस्तीवरील शेतकऱ्याच्या बोकडावर बिबट्याने हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे.रविवारी (दि २८ ) रात्री घडली आहे. निरावागज परिसरात बिबट्याचा वावर असून शेजारील गाव व वाड्या-वस्त्यांवर बिबट्याची भीती निर्माण झाली आहे.

पन्हाळे वस्ती येथील शेतकरी सोमनाथ पन्हाळे याच्या शेळ्यांवर बिबट्याने रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हल्ला केला यामध्ये पन्हाळे यांचे नुकसान झाले आहे. याबाबात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली असता वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. पन्हाळे वस्तीवर जिल्हा परिषदेचे मा.अध्यक्ष विश्वास देवकाते, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक मदन देवकाते, पोलीस पाटील अमित देवकाते, सरपंच यशवंत देवकाते, वन विभागाचे अधिकारी यांनी पाहणी केली यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, उपस्थित होते.

नुकसान ग्रस्त शेतकरी सोमनाथ पन्हाळे त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. तर ग्रामस्थांच्या मागणीनुसार नीरावागज परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे व पिंजरा बसविण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.यापूर्वी देखील बारामती एम आय डी सी मध्ये तर काठेवाडी येथून तीन बिबटे पकडण्यात आले आहेत.नुकताच शेतकऱ्यांनी बिबट्याची दहशत संपत होती तर निरावगज येथे बिबट्याच्या हल्यायाने पुन्हा एकदा ग्रामीण भागात भीती निर्माण झाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा