हवेली तालुक्यातील कोलवडी येथे बिबट्याचा मेंढीवर हल्ला

कोलवडी (हवेली), दि. ८ जुलै २०२० : हवेली तालुक्यातील कोलवडी येथील गावा जवळ भालसिंग वस्तीवरील शेतकऱ्याच्या मेंढीवर बिबट्याने हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे. बुधवार (दि ७) रोजी रात्री ही घटना घडली आहे. कोलवडी-भालसिंग वस्ती परिसरात बिबट्याचा वावर असून शेजारील गाव व वाड्या – वस्त्यांवर बिबट्याची भीती निर्माण झाली आहे.

भालसिंग वस्ती येथील आप्पा ठकाजी भिसे वय ३५ या शेतक-याच्या मेंढीवर बिबट्याने रात्री १० वाजण्याच्या सुमारास हल्ला केला यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याबाबात ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली असता वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. वनसंरक्षक पी. एस. वायकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

वन विभागाचे अधिकारी यांनी पाहणी केली त्यावेळेस मोठ्या संख्येने ग्रामस्थ, उपस्थित होते. नुकसान ग्रस्त शेतकरी आप्पा ठकाजी भिसे यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. तर ग्रामस्थांच्या मागणीनुसार कोलवडी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे व पिंजरा बसविण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

यापूर्वी देखील चार दिवसांपूर्वी आव्हाळवाडी मध्ये बिबटे पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता. भालसिंग वस्ती येथे बिबट्याच्या हल्याने पुन्हा एकदा ग्रामीण भागात भीती निर्माण झाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा