कोरोनो मध्ये बिबट्याचा मुक्त संचार

10

श्रीरामपुर: तालुक्यातील, उक्कलगांव बेलापुर परिसरात अनेक ठिकाणी बिबट्याचा मुक्त संचार वाढलेला आहे सध्या संपुर्ण जगभर कोरोनो थैमान सुरु आहे त्या शेतकरी मोठ्या अडचणीत आलेला आहे. गेली दोन महिन्यापूर्वी बिबट्याने गळनिंब येथिल ३ वर्ष चिमुरडीवर हल्ला करुन बळी घेतला होता. अनेक शेतकऱ्यांना देखिल दर्शन दिले होते.

या भागातील शेतकरी हे कोपरगांव येथिल वनअधिक्षक संतोष जाधव यांना सदर ठीकाणी बिबट्या आसल्याची कल्पना देत आहे; पण वनखात्याचे जाधव कोरोना चे कारण पुढे करत दुर्लक्ष करत आहे. तर अनेक ठिकाणी किरकोळ खराब झालेली पिंजरे पडलेली आहे ते देखिल दुरुस्त होत नाही.

एकी कडे नागरिक पिंजरा लावण्याची मागणी करतात तर दुसरी कडे अनेक पिंजरे खराब होऊन पडलेली आहे वनखात्याचे अधिकाऱ्यांचा गळथान कारभार सुरु आहे तरी या भागात तात्काळ पिंजरे लावावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.