सिन्नर तालुक्यातील जोगलटेंभी परिसरात बिबट्या जेरबंद

नाशिक, दि.२५ मे २०२०: गेल्या महिन्यांभरात नाशिकरोड ते सिन्नरपर्यंतच्या अनेक भागात बिबट्यांचे सर्रासपणे दर्शन होत आहे. ज्या- ज्या भागात बिबट्या नागरिकांना दिसला आहे त्या त्या भागात नागरिक दहशतीखाली वावरत आहे. अशातच उन्हाळ्यात पाण्याच्या शोधार्थ दारणा व गोदावरी नदीच्या काठावरील गावांमध्ये बिबट्यांची संख्या प्रचंड वाढली आहे.

रोजच बिबट्याचे दर्शन होत असल्याने ठिकठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी वाढली आहे. त्याप्रमाणे कचरु जेजूरकर यांच्या गट नंबर २४२ मध्ये बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावला होता.

गेल्या पंधरा दिवसापासून जोगलटेंभी परिसरात पिंजरा लावण्यात आला होता. शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास १० वर्ष वयाचा बिबट्या अखेर जेरबंद झाला.

वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी रविवारी सकाळी पिंजऱ्यात बंदिस्त झालेला बिबट्या सिन्नरच्या मोहाडी येथील वनविभागाच्या उद्यानात घेऊन गेलेे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा