चित्रपट निर्माते-दिग्दर्शक हरीश शाह काळाच्या पडद्याआड…

मुंबई, ७ जुलै २०२० : कॅन्सरशी झालेल्या लढाईत चित्रपट निर्माते हरीश शाह यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. त्यांना घशाला कर्करोग झाला होता आणि ते ७६ वर्षांचे होते.

हरीश शहा यांचे भाऊ आणि चित्रपट निर्माते विनोद शहा यांनी सांगितले की त्यांनी सकाळी सहा वाजता आपल्या घरी अखेरचा श्वास घेतला.विनोद शहा यांनी सांगितले की ते १० वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होते.

पवन हंस शवविच्छेदनगृहात कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर मंगळवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

शाह यांनी ‘मेरे जीवन साथी’, ‘काला सोना’, ‘राम तेरे कितने नाम’ सारख्या चित्रपटांची निर्मिती केली.१९८० मध्ये दिग्दर्शकाच्या रूपात नव्या इनिंगची सुरुवात त्याने ‘धन दौलत’ चित्रपटाद्वारे केली.या व्यतिरिक्त त्यांनी १९८८ मध्ये ‘जलजला’ हा चित्रपट आणि १९९५ मध्ये ‘अब इंसाफ होगा’ दिग्दर्शित केले होते. निर्माता म्हणून त्यांचा शेवटचा चित्रपट २००३ मध्ये आला होता तो म्हणजे जाल : द ट्रॅप.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा