अहमदनगर, १२ सप्टेंबर २०२० : सैन्यदलातील माजी सैनिकांनी एकत्र येवून स्थापन केलेल्या भारतीय देशभक्त पार्टी विचारधारेचे अध्यक्ष शिवाजी डमाले व त्यांच्या देशभरातील तमाम माजी सैनिकांनी मुख्यमंत्री व शिवसेना अध्यक्ष उध्दव ठाकरे यांना काल मुंबईत नौदलातील एका माजी सैनिकाला झालेल्या हल्ल्याचा निषेध करत एक व्हिडिओ संदेश दिला आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले की पंढरपुरचे दिवंगत आमदार सुधाकर परिचारक,हे माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाजप पक्षाचे होते. त्यांनी २०१७ मध्ये सैनिक परिवाराचा अवमान केला होता. त्यावेळी माजी सैनिकांनी महाराष्ट्रभर आंदोलन केले होते.तेंव्हा माजी सैनिकांच्या आंदोलनाला प्रतिसाद देऊन फडणवीसांनी सुधाकरपंत परिचारकांविरूध्द कारवाई केली होती . त्याप्रमाणे मुंबई येथील नौदलातील माजी सैनिकाला मारहाण करणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर आपण कारवाई करण्याचे आदेश देणार का ? माजी मुख्यमंत्री फडणवीसंनी परिचारकांवर कारवाई केली व सैनिकांच्या बाजूने निर्णय दिला होता.
आत्ता व्हिडिओ निवेदन आम्ही आपणास पाठवीत आहोत.आपले पोलिस खाते,हा मेसेज व व्हिडिओ आपल्याकडे पाठवतीलच अशी अपेक्षा आम्ही ठेवतो. सोमवारी दि.१४/९/२०२० रोजी अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच माजी सैनिक जमा झाल्यावर , जिल्हा अधिकाऱ्यांमार्फतही आपल्याकडे लेखी निवेदन पाठविणार आहोत. माजी सैनिकाला मारहाण करणाऱ्या शिवसेनेच्या गुंडांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.ते गुंडे जी भाषा वापरतात,ती भाषा या देशाचा सैनिक कधीही वापरणार नाही. शिवसेनेचे हे गुंड या माजी सैनिकाला अभद्र भाषेत शिवीगाळ करत होते. शिवसेनेचे सैनिक म्हणविणाऱ्या या गुंडांना ‘सैनिक’ शब्द वापरून देशसेवा करणाऱ्या सैनिकांचा हा एक प्रकारचा अवमान केला आहे. त्यांचे शिवसैनिक ऐवजी “शिवगुंडे” असे नामकरण करणेच योग्य ठरेल.
माजी सैनिक संघटना, फेडरेशन व भारतीय देशभक्त पार्टी विचारधारा आपल्या माजी सैनिकांचे संरक्षण करण्यासाठी सक्षम आहे .आम्ही देशाचे परकिय शत्रुंपासून संरक्षण केलेले आहे.आमचे कितीतरी सहकारी सैनिक शहिद झालेले आहेत. तिथे अशा गुंडांची काय बिशाद . तुमच्या पक्षाच्या सैनिक नाव लावून गुंडागर्दी करणाऱ्या कार्यकर्त्यांना माजी सैनिक माफ तर कधीच करणार नाही परंतू त्यांच्या सारखी शिवीगाळ ही करणार नाही. तुमचे पोलिस त्या गुंडावर तात्पुर्ती कारवाई केल्याचे नाटक करून IPC कलम ३२३,५०४,५०६ अशी क्षुल्लक कलमे लावून सोडून देतील.
परंतु माजी सैनिकांनी आमदार परिचारक हटाओ मोहीम सुरू केल्यापासून भारतीय देशभक्त पार्टी विचारधारा संघटीत केली आहे. आम्हाला राजकारणात परिवर्तन घडवायचे आहे.म्हणून आपणास विनंती आहे की आपण देखील ताबडतोब माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीसांप्रमाणे, त्या गुंडगिरी करणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्रातून हद्दपार करण्याचा आदेश द्यावा . अशी भारतीय देशभक्त पार्टी विचारधारेची अपेक्षा आहे.
तरच माजी सैनिक संघटना, फेडरेशन व भारतीय देशभक्त पार्टी विचारधारा आपल्या निर्णयाचे स्वागत करेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी
ही शिवसेना नाहीच.छत्रपतिंच्या नावावर गुडगिरी हा .छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा अपनमान करनारी ठाकरेसेना आहे.