लाईफ इन्शुरन्स पॉलिसी प्रीमियमसाठीची ५ लाख रुपयांपेक्षा अधिकची रक्कम करपात्र राहणार

नवी दिल्ली, १७ ऑगस्ट २०२३ : प्राप्तिकर खात्याने जीवन विमा पॉलिसीसंबंधी एक नवीन नियम आणला आहे.आता विमाधारकांना त्यांच्या विम्याच्या हप्त्यावर कर भरावा लागणार आहे. हा नियम सरसकट सर्वांनाच लागू नाही. त्यासाठी काही अटी आणि शर्ती निश्चित करण्यात आल्या आहे. एका निश्चित मर्यादेनंतर प्रीमियमची रक्कम असेल तर विमाधारकांना कर भरावा लागेल. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने आयकर सुधारीत नियम,२०२३ मध्ये बदला संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. एखादया जीवन विमा पॉलिसी विमाधारकाने एक एप्रिल अथवा त्यानंतर ही पॉलिसी सुरु केली असेल तर त्यांना हा नियम लागू होतो.

या नियमानुसार,जीवन विमा पॉलिसीच्या प्रीमियमसाठी पाच लाख रुपयांपेक्षा अधिकची रक्कम करपात्र असेल. आता जीवन विमा पॉलिसीसाठीची पाच लाख रुपयांहून अधिकची रक्कम कर मुक्त नसेल. जीवन विमा पॉलिसी विमाधारकाने या एक एप्रिल वा त्यानंतर सुरु केली तर त्यांना पण हा नियम लागू असेल. इनकम टॅक्स खात्याने या बदलाची माहिती दिली आहे. एक एप्रिल २०२३ रोजी किंवा त्या नंतर घेण्यात आलेल्या विमा पॉलिसीवर नियम १०(१०डी) अंतर्गत मॅच्युरिटी बेनिफिटवर कर सवलत देण्यात येईल, पण जर विमाधारकाने एका वर्षात विमा पॉलिसीच्या एकूण हप्त्यापोटी पाच लाख रुपयांपेक्षा अधिकची रक्कम भरल्यास त्याला कर द्यावा लागेल. ५ लाख रुपयांपेक्षा जास्त हप्त्यावर हा कर द्यावा लागेल.

पाच लाखांपेक्षा अधिक प्रीमियम भरल्यानंतर होणारी कमाई किती हे पाहण्यात येईल.नियमानुसार कर लावण्यात येईल.युलिप सोडून इतर जीवन विमा पॉलिसीवर कर आकरण्याची सूचना केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४ मध्ये करण्यात आली होती. तज्ज्ञांच्या मते,पाच लाख रुपयांहून अधिकचा प्रीमियम भरल्यास त्याआधारे किती कमाई झाली त्याचा हिशोब करुन कर लावण्यात येईल. हा कर मॅच्युरिटीवर मोजला जाईल. एखाद्या विमाधारकाच्या मृत्यूनंतर प्रीमियमच्या रक्कमेवर कर लागू करण्यात येणार नाही,असे आयकर खात्याने स्पष्ट केले आहे.

बाजारात नवीन विमा पॉलिसी दाखल झाल्या आहेत. त्यात परताव्याची हमी मिळते. या पॉलिसी ७ ते ७.५% परतावा देतात. पारंपारिक गुंतवणूक योजनांपेक्षा हा रिटर्न अधिक आहे. या योजनांमध्ये पाच लाख रुपयांपर्यंतचा वार्षिक प्रीमियम अगदी करमुक्त आहे. जर एखादी व्यक्ती या योजनेत पाच वर्षांकरीता दरमहा २०,००० रुपये गुंतवणूक करत असेल तर तो या योजनेत बारा लाख रुपयांची गुंतवणूक करतो. दहा वर्षांत या योजनेत ही रक्कम २०.५ लाख रुपये होईल. विनाजोखीम गुंतवणूक करण्यासाठी युनिट-लिंक्ड इंश्योरेंस पॉलिसी चांगली आहे. ही योजना बाजारावर आधारीत असते. बाजाराने उसळी घेतल्यावर गुंतवणूकदारांना जोरदार परतावा मिळतो.या योजनेत १२ ते १५% रिटर्न मिळू शकतो. याशिवाय ही योजना कर बचतीसाठी मदत करते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा