मुंबई, ११ ऑगस्ट २०२०: महाराष्ट्रात सध्या आघाडी सरकारने भाजप खासदार नारायण राणे यांना चांगलेच धारेवर धरलेले दिसत आहे. आता मंत्री नबाव मलिक यांनी राणेंवर पुन्हा घणघणाती टिका केली आहे.राणे यांनी आघाडी सरकावर तसेच शिवसेनेला चांगलेच निशाण्यावर धरले होते.
काय टिका केली होती राणेंनी…..
“येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंतच ठाकरे सरकार राहिल. सरकारमध्ये समन्वय नसल्याने हे सरकार फार काळ टिकणार नाही. शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांमध्ये एकमत दिसत नाही त्यामुळे लवकरच हे सरकार सत्तेतून जाईल ,’बाप बेटे कॅबिनेटला नसतात पण पार्ट्यांना असतात. पण सहा महिने झाले एकाही कॅबिनेटला मुख्यमंत्री उपस्थित नाहीत. हे सरकार पाहुणे आहे पिंजऱ्यातले..ते लवकरच उडून जाईल. मातोश्री हा पिंजरा आहे” असं म्हणत नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली होती.
मंत्री नवाब मलिक यांचा पलटवार…..
“पोपटासारखं कागद काढून लोकांना भविष्य सांगणारा जो पक्ष आहे त्या पक्षात त्यांचा प्रवेश झाल्यानंतर ते देखील पोपटासारखे बोलणारचं ना…” भविष्यवाणी करून राजकारण कधी चालत नाही. राजकारणात नंबर गेम असतो. त्यामुळे पोपटाने चिठ्ठ्या काढल्या आणि तसंच घडलं असं कधी होत नाही. भाजपमध्ये पोपटगिरी करणारे अनेक लोक आहेत.परंतू चिठ्ठ्यांवर सरकार चालत नाही, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं.अशा परखड शब्दात नवाब मलिक यांनी नारायण राणेंची कानउघडणी केल्याचे दिसले.
न्यूज अनकट प्रतिनिधी