अतिक अहमदप्रमाणे माझ्याही डोक्यात गोळी मारतील ; आझम खान यांनी व्यक्त केली भीती

15

उत्तर प्रदेश, २९ एप्रिल २०२३: उत्तर प्रदेशमधील गॅगस्टर आणि माजी खासदार अतिक अहमद यांच्या प्रमाणे माझीही डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात येईल, अशी भीती समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांनी व्यक्त केली आहे. रामपुर येथे महानगरपालिका निवडणूकीच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

मागील काही दिवस आजारी असणारे आझम खान नुकतेच महापालिका निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या उमेदवार फातिमा जबी यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत म्हणाले की, आम्ही मतदान करु तो आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. पण तोही आमच्याकडून दोनदा हिसकावला गेला. आता तिसऱ्यांदा हा हक्क हिरावून घेतला तर तुम्हाला श्वास घेण्याचाही अधिकार राहणार नाही, असेही त्यांनी उपस्थितांना सांगितले आहे.

मला आणि माझ्या कुटुंबाला अशा गोळ्या घातल्या जाव्यात अशी इच्छा आहे का, माझ्याकडून आणि माझ्या मुलांकडून काय हवे आहे? असा सवालही त्यांनी यावेळी केला. रामपुर महापालिका कंत्राटावर आहे, असा आरोप करणाऱ्यांनी संपूर्ण देश करारावर ठेवला होता, लाल किल्ला विकला गेला, विमानतळ विकले गेले, बंदरे विकली गेली, रेल्वे विकली गेली, आता काय उरले आहे. असे सवालही त्यांनी उपस्थित केले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा