शिधापत्रिका आधारकार्ड सोबत लिंक करा : दलित महासंघची मागणी

पुणे,३० सप्टेंबर २०२० : दलित महासंघ शाखा व जनजागृती विचारधारा मंचाच्या वतीने पुणे जिल्ह्याधिकारी कार्यालयात पुणे शहरातील झोपडपट्टी शिधापत्रिका धारकांचे आधारकार्ड लिंक करण्याबाबत निवेदन देण्यात आले.लॉकडाऊनच्या काळात अन्नपुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या.समाजातील सर्व घटकांना अन्न मिळावे , यासाठी २०१३ मध्ये अन्न सुरक्षा कायदा पारित करण्यात आला. हातावरच पोट असणाऱ्या पुण्यातील सर्वे नं.१३३ ,१३२, दांडेकर पूल, अंबिल ओढा परिसरातील वसाहतीमध्ये राहणाऱ्या लोकांना लॉकडाऊन मध्ये शिधापत्रिकेवर मिळणारे रेशन मिळाले नाही.

कोरोनाचा पार्श्वभूमीवर गरिबांना ‘लाभार्थी’ शिक्के शिधापत्रिकेवर मारून रेशनचे वाटप करण्यात आले.
मात्र या परिसरातील लोकांचे आधारलिंक नसल्याने शिधापत्रिका दुकांनाकडून ह्या नागरिकांना रेशन मिळाले नाही. वारंवार शिधा वाटप दुकान मालकांकडून रेशन देण्यास टाळाटाळ केली जात होती. गेल्या वर्षी पूर आल्याने बऱ्याच लोकांचे महत्वाचे कागदपत्रे पुरात वाहून गेली आहेत खराब झाली आहेत. त्यामुळे अनेक या परिसरातील शिधा पत्रिकाधारक केवळ आधार कार्ड लिंक नसल्यामुळे अन्नसुरक्षा योजनेपासून वंचित राहिले आहेत.

त्यामुळे या परिसरातील लोकांचे शिधापत्रिका आधारकार्ड सोबत लिंक करून घेण्यात याव्या व त्या सोबतच सर्वेक्षण करून आर्थिक निकषांच्या आधारे गरीब व दुर्बल घटकांना अन्नसुरक्षा योजनेतील हक्क मिळावे’ , अशी मागणी गणेश मोरे यांनी ह्या निवेदनाद्वारे केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा