पुणे , १ ऑगस्ट २०२० : पुण्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव हा सातत्यानी वाढत जातोय . अनेक प्रतिबंध लावून सुद्धा कोरोनाच्या संख्या ही वाढत असल्याने पुणे महानगरपालिकेने लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा लॉकडाउन ३१ ऑगस्ट पर्यत वाढवण्यात आला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाउन पुन्हा वाढवणे गरजेचे आहे असे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लॉकडाउन हा वाढवण्यात आला आहे . त्यात पुण्यात आधी २९ जुलै पर्यत लॉकडाउन होता मात्र लॉकडाउनची वैधता संपल्यानंतर हा नविन लॉकडाउन १ ते ३१ ऑगस्ट पर्यत राबवला जाणार आहे. या लॉकडाउन मध्ये नवनविन उपाययोजनाांची अंमलबजावणी करून हा प्रसार आटोक्यात आणण्याचा प्रसत्न केला जाईल असे ही आयुक्तांनी या वेळेस सांगितले. मागील नियमावलीमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल केले गेले नाहीत त्यामुळे नविन लॉकडाउनमध्ये सुद्धा तेच नियम पाळले जातील.
पुणे महानगरपालिकेतील प्रतिबंधीत क्षेत्रात अत्यावश्यक सेवा या सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यत आणि संध्याकाळी ५ ते ६ पर्यंत सुरू राहतील तर प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील दुकाने ही त्यांच्या दररोजच्या वेळेत म्हणजे सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यत सुरू राहतील . आणि बिगर अत्यावश्यक सेवातील दुकाने ही p1आणि p2 पद्धतीने सम विषम पद्धतीने सुरू राहतील. मॉल तसेच मार्केट हे ५ ऑगस्ट पासून सुरू होतील मात्र उद्याने ,व्यायमशाळा या बंदच राहतील.
खाजगी कार्यालयात फक्त १० टक्के तर शासकीय कार्यालयात १५ टक्के कर्मचाऱ्यांना येण्यास परवानगी दिली आहे त्याच बरोबर कुरीअर सेवा ही नियमवालीत असल्याप्रमाणे सुरू राहतील. तसेच अधिकृत पथारी व्यसायिकांना १० मीटर अंतर ठेवून त्याचा व्यावसाय करण्यास परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे शाळा , महाविद्यालये ही पुढील आदेश येई पर्यत बंद राहतील. मात्र या सर्व गोष्टीमध्ये मास्क आणि सोशल डिस्टंन्सिंग कटाकक्षाने पाळणे बंधनकारक आहे.
त्यामुळे पुढील आदेश येई पर्यत हा लॉकडाउन १ ते ३१ ऑगस्ट पर्यंत रात्री १२ वाजेपर्यंत असणार आहे असे पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले .
न्यूज अनकट प्रतिनिधी