कल्याण डोंबिवलीत १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन घोषित

कल्याण, दि. ११ जुलै २०२०: कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कल्याण डोंबिवलीत आणखी आठ दिवस म्हणजे १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. रविवार १९ जुलै सकाळी ५ वाजेपर्यंत लॉकडाऊन असेल याआधी हा लॉकडाऊन २ जुलै ते १२ जुलै सकाळी ७ वाजेपर्यंत होता. वाढत्या रुग्णसंख्येवर आळा बसवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे असे कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी सांगितले.

कल्याण डोंबिवलीतील रुग्णांची संख्या ही १० हजाराच्यावर गेली असून मृतांची संख्या ही १७२ च्या घरात पोहचली आहे. हा लॉकडाऊन गरजेचा आहे त्यामुळे अटी व नियम हे पुर्वीप्रमाणेच राहतील. कोरोनाच्या साखळीला तोडण्यासाठी हा लॉकडाऊन महत्वाचा ठरेल अस आयुक्तांनी या वेळेस सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राजश्री वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा