लॉकडाऊन मुळे दुरुस्त होतोय ओझोन थर

न्यूयॉर्क, २७ एप्रिल २०२०: लॉकडाऊनमुळे माणसे अस्वस्थ होत आहेत , परंतु प्राणी, झाडे,आणि निसर्ग सुटकेचा श्वास घेत आहेत. एप्रिलच्या महिन्याच्या सुरूवातीस वैज्ञानिकांनी उत्तर ध्रुवाच्या ओझोन थरात दहा लाख चौरस किलोमीटरचे छिद्र दिसले होते. हे इतिहासातील सर्वात मोठे छिद्र होते. लॉकडाऊनमुळे प्रदूषण कमी झाल्यामुळे आता ओझोन चे छिद्र भरून निघत आहे. ही खूप चांगली बातमी आहे.

पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या वर ओझोनचा थर आहे. याआधीही लॉकडाऊनने कमी झालेल्या प्रदूषणामुळे दक्षिण ध्रुवाच्या ओझोन थरातील छिद्र कमी झाले होते. एप्रिलच्या सुरूवातीस उत्तर ध्रुवाच्या ओझोन थरावर वैज्ञानिकांना एक मोठे छिद्र दिसले होते. इतिहासातील हे आतापर्यंत चे सर्वात मोठे छिद्र असल्याचा वैज्ञानिकांनी दावा केला आहे. हे छिद्र १ दशलक्ष चौरस किलोमीटरमध्ये पसरले होते.

उत्तर ध्रुव म्हणजे नॉर्थ पोल किंवा पृथ्वीचा आर्क्टिक प्रदेश या भागात शक्तिशाली पोलर वर्टेक्स बनले गेले होते. जे आता संपले आहे. उत्तर ध्रुवाच्या अगदी वरच्या उंच भागात स्ट्रॅटोस्फियरवर प्रदूषणामुळे ढग तयार झाल्याने ओझोनचा थर पातळ होत गेला होता.

ओझोन थरातील छिद्र कमी करण्यामागील मुख्यत: ढग, ​​क्लोरोफ्लोरोकार्बन आणि हायड्रोक्लोरोफ्लोरोकार्बन ही तीन मोठी कारणे होती. स्ट्रॅटोस्फियरमध्ये या तिघांचे प्रमाण वाढले. यामुळे जेव्हा सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांची स्ट्रॅटोस्फीयरमध्ये टक्कर होते तेव्हा त्यामधून क्लोरीन आणि ब्रोमिनचे अणू बाहेर पडत होते. हा अणू ओझोनचा थर पातळ करीत होता. ज्यामुळे हे छिद्र मोठे होत होते. प्रदूषण त्यात भर घालत असे , परंतु लॉकडाऊनमध्ये प्रदूषणाचा प्रभाव कमी झाला.

नासाच्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार अशी स्थिती सहसा दक्षिण ध्रुव म्हणजेच साउथ पोल अर्थात अंटार्क्टिकाच्या ओझोन थरात दिसून येते. परंतु यावेळी तो उत्तर ध्रुवाच्या वरील ओझोन थरात दिसून आला. स्ट्रॅटोस्फियरचा थर पृथ्वीपासून १० ते ५० किमी पर्यंत असतो. त्याच्या मध्यभागी ओझोनचा एक थर आहे जो पृथ्वीवरील जीवनास सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण देतो.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा