केंद्र सरकारचा मोठा निर्णय, लॉकडाऊन १७ मे पर्यंत वाढले

नवी दिल्ली, १ मे २०२०: देशातील कोरोना विषाणूचे संकट सतत वाढत आहे. कोरोना संकटाला तोंड देण्यासाठी देशातील लॉकडाऊन दोन आठवड्यांसाठी वाढविण्यात आला आहे. आता लॉकडाऊन देशात १७ मे पर्यंत सुरू राहणार आहे. गृहमंत्रालयामार्फत ही माहिती देण्यात आली.

वास्तविक, दुसरे लॉकडाऊन येत्या तीन तारखेला संपणार होते. मात्र, यापूर्वी मोदी सरकारच्या माध्यमातून देशभरात लॉक डाऊन दोन आठवड्यांसाठी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता हे लॉकडाउन ४ मे ते १७ मे पर्यंत सुरू राहील. या काळात सर्व शाळा, कॉलेज, धार्मिक कार्य, राजकीय कार्यक्रम, जिम, हॉटेल इत्यादी गोष्टी बंद राहणार आहेत.

आयसीएमआर ने असा अहवाल सुद्धा दिला होता की ३ में नंतर देशात कोरोना प्रकरणांचा उच्च बिंदू गाठेल. त्यानंतर हळूहळू १७ तारखेपर्यंत देशातील कोरोना रुग्ण सापडण्याची संख्या कमी होईल. त्या अनुषंगाने केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असावा.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा