लॉकडाऊनच्या काळात १ लाख १३ हजार ८९३ गुन्ह्यांची नोंद

मुंबई, दि. २४ मे २०२०: कोविड १९ मुळे राज्यात सर्वत्र लॉकडाऊन आहे. राज्यात सर्वत्र कलम १८८ लागू करण्यात आला असून या काळात पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये १ लाख १३ हजार ८९३ गुन्हे नोंद झाले असून २२ हजार ७९४ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ५ कोटी २८ लाख १९ हजार ७४७ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी  ४ लाख १५ हजार ५९१ पास  पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच ५ लाख १९ हजार १६८ व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३२२ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ६९ हजार ५६७ वाहने जप्त करण्यात आली . तसेच परदेशी नागरिकांकडून  झालेले व्हिसा उल्लंघनाचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.

पोलिसांवर हल्ला करणाऱ्यावर कारवाई

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध  कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत. या दरम्यान पोलिसांवर  हल्ला होण्याच्या २४८ घटना घडल्या. त्यात ८३० व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्दैवाने  मुंबईतील १० पोलीस व १ अधिकारी अशा एकूण ११ , पुणे २, सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण १,ए.टी.एस.१’ ठाणे ग्रामीण १ अशा १८ पोलिस वीरांना आपला जीव गमवावा लागला. सध्या ७९ पोलीस अधिकारी व २९७ पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर उपचार  सुरू आहेत. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा