लोकायत संघटनेचा दगड खाण असंघटित कामगार विकास परिषद, महाराष्ट्र यांच्या बेमुदत ठिय्या आंदोलनाला पाठिंबा

पुणे , २० जानेवारी २०२१:”जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या मालकीची”, “एक गुंठा भूखंड मंजूर करा”, “7/12 वर महिलेचं नाव असलंच पाहिजे”, अशा घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन चालू आहे. वाघोली येथील गायरानात राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला निवास प्रयोजनासाठी एक गुंठा भूखंड मंजुरीसाठी हे आंदोलन सुरू झाले.

ज्या पध्दतीने प्रशासन वाघेश्वर नगर, सुयोग नगर व गाडीतळ या कामगार वस्त्यांच्या फक्त एक गुंठा भूखंड जागा मिळण्याबाबत प्रकिया हाताळत आहे, त्यावरून बहुजनांच्या आयुष्याची किंमत कचऱ्यापेक्षाही कमी आहे असं दिसतंय, हे मत adv. बस्तू रेगे यांनी मांडलं.

वाघोली मधील दगड खाणीत राहणाऱ्या आशा बांगर, कांताबाई पवार यांनी गेल्या २१ वर्षापासून केलेले आंदोलन, निवेदन याबद्दलचे अनुभव मांडले. समिती स्थापन झाल्या, ग्रामसभेत ठराव मंजूर झाला, तरी आमचा प्रश्न सुटला नाही, ही खंत त्यांनी व्यक्त केली. एक गुंठा जागा मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही, असा निर्धार करून आम्ही इथे आलो आहोत, असं त्यांनी सांगितलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा