लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृती दिन

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म १८ ऑगस्ट १९२० मधे सांगली जिल्हातील वाटेगाव गावात मातंग समाजात झाला. त्यांचे पुर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपले संपुर्ण आयुष्य दिनदुबळ्या, गोरगरीब, शिक्षणापासून व विकासापासून वंचित राहिलेल्या समाजाला न्याय मिळावा यासाठी झोकुन दिले. त्यांनी लोकप्रबोधना मार्फत आपले विचार मांडले.

अण्णाभाऊ साठे यांनी अनेक प्रकारच्या लावण्या, पोवाडे, लोकनाट्य, कथासंग्रह, कांदबऱ्या व पुस्तके लिहली आहेत.

त्यांनी लिहलेली काही लोकप्रिय साहित्य :-


कांदबऱ्या : फकीरा, अलगुज, वारणेचा वाघ, आघात, गुलाम, चिखलातील कमळ

कथासंग्रह: कृष्णाकाठच्या कथा, गजाआड, फरारी, निखारा, पिसाळलेला माणुस

नाटके: सुलतान, इनामदार, पेंग्याच लगीन.

प्रवास वर्णन: माझा रशियाचा प्रवास.

पुस्तक: शाहीर.

स्वत:च्या दु:खांचा विचार न करता, आपले विचार, आपले कार्य व प्रतिभा जनसामान्य लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम व लोककलेला प्रतिष्ठा मिळवून देणारे आणि गरिबांच्या व वंचितांच्या व्यथा प्रभावी व प्रखरपणे मांडणारे लोकशाहीर, भीमशाहीर व शिवशाहीर अण्णा भाऊ साठे. शिक्षणापासून, समग्र विकासापासून वंचित राहिलेल्या व जातिभेदांमुळे, जातींच्या उतरंडीमुळे वंचित राहिलेल्या मातंग समाजातील एक विद्वान व्यक्तिमत्त्व म्हणजेच आमचे अण्णाभाऊ साठे.

समाजाच्या क्रांतीचा पेटलेला निखारा अन्याया विरुद्ध बंड पुकारणारे थोर समाजसुधारक मातंग समाजाच्या कल्याणासाठी पेटलेला झंझावात दिवा जगविख्यात साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १८ जुलै १९६९ रोजी प्राण ज्योत मालवली.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे लोकप्रिय विचार:-


१) तु गुलाम नाहीस तर तु या वास्तव जगाचा निर्माता आहेस.- साहीत्यसम्राट अण्णाभाऊ साठे.

२) नैराश्य हे धारदार तलवारीवर साचलेल्या धुळीसारखे असते धुळ झटकली की ती तलवार पुन्हा धारदार बनते- साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे.

३) जात हे वास्तव आहे, गरिबी ही कृत्रिम आहे. गरिबी नष्ट करता येवू शकते पण जात नष्ट करणे आपले सर्वांचे काम आहे.- साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे.

४) अनिष्ट धर्माचा आचरणाने माणसांना हिन समजणे हा धर्म नसून रोग आहे- साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे.

५) यह आझादी झूटी है, देश की जनता भुखी है.- साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे.


संकलन : न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा