लोकशाहीची गळचेपी…

महाराष्ट्रात सध्या लोकशाहीला काळिमा फासण्याचे काम सुरू आहे. असे विचित्र राजकारण सुरू आहे.भाजप सरकारने एका रात्रीत सरकार स्थापन करून लोकशाहीला मूर्ख बनविण्याचे काम केले आहे. त्यात भाजपची साथ दिली राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी. एकीकडे संपूर्ण माध्यमातून संयुक्त सरकार येण्याचा बातम्या झळकत असताना रातोरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इकडे सरकार स्थापन केले.
विधानसभेचा निकाल लागून आजच महिना झाला आहे. त्यात बहुमतासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे अपयशी झाल्यानंतर महाराष्ट्रात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. तरीही महाविकासआघाडी सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत होती तर त्यांचा बैठकीतून सकारात्मक परिणाम होताना दिसत होते.
लवकरच संयुक्त सरकार स्थापनेची घोषणा होणार तेवढ्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते अजित पवार यांनी बंड केला आणि सकाळी ८:०५ मि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप घडवून आणला. यात राज्यपालांच्या भूमिकेवर देखील शंका , संताप व्यक्त होऊ लागला आहे. पहाटेच राष्ट्रपती राजवट हटवून सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अनेकांनी हा लोकशाहीतील काळा दिवस असल्याचे म्हटले.
‌ अशा प्रकारच्या राजकीय घडामोडी एकीकडे घडत आहेत. तर शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले.आणि पुन्हा महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू झाले. महाराष्ट्रात शेतकरीच काय तर तरुणांच्या बेरोजगारीचे प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत. तर दुसरीकडे शिक्षित तरुण हा या राजकीय भुकंपाकडे मिश्किल पद्धतीने राजकारणांची मोदी १८ तास काम करत होते तर राज्यपाल २४ तास काम करतात. “भाजपच्या पुस्तकाला राष्ट्रवादीचे कव्हर आणि अजित बाई निघाल्या कमळाबाईचे लव्हर” अश्या प्रकारे सोशल मीडियावर खिल्ली उडवण्यात मग्न आहे.
अशा कमरेखालच्या राजकारणामुळे ‘लोक’शाहीला राजकारण्यांचा विसर पडताना दिसत आहे. तर महाराष्ट्रातील राजकारण हे लोकशाहीची गळचेपी करताना दिसत आहे. तर दुसरीकडे परत महाविकासआघाडीच्या बैठकींना वेग आला आणि त्यांनी विधीमंडळाच्या पदावरून अजित पवारांची हकालपट्टी केली. तर बैठकीच्या ठिकाणी आमदार पकडून आणण्याचे काम शिवसेनेचे एकनाथ शिंदे करताना दिसले तर काँग्रेस पक्षाने आज दिवस काळ्या शाईने लिहिले जाईल अश्या शब्दात प्रतिक्रिया दिल्या.
महाराष्ट्रातील अश्या गलिच्छ राजकारणामुळे महाराष्ट्राचे भवितव्य धोक्यात आसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे लोकशाहीची या राजकारणी लोकांनी थट्टा मांडल्याचे सध्या चित्र आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा