एक कोटी चौदा लाखांच्या फसवणूक प्रकरणी लोणंद पोलीसात पाचजणांवर गुन्हा दाखल

फलटण,सातारा २७ जुलै २०२३ : कापशी ता.फलटण येथील शरयू साखर कारखान्याची एक कोटी चौदा लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी पाच जणांवर लोणंद पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये कंपनीच्या तीन इंजिनिअरचा समावेश आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कापशी ता.फलटण येथील शरयू ऍग्रो इंडस्ट्रीज लि.कापशी या कारखान्यात, २०२१ पासून आज पर्यंत फॅब्रिक्स इंडस्ट्रीज तर्फे वसंत लोढा रा.अहमदनगर व ऍक्युरेट इंजीनियरिंग अँड इरेक्शन यांचे तर्फे प्रसाद आण्णा रा.सांगली, यांनी महाराष्ट्र शासनाचे व वेगवेगळ्या सरकारी निमसरकारी कंपन्यांचे खोटे दाखले सही शिक्के असलेली कागदपत्रे सादर करून फसवणुक केली. कंपनीमधील सीनियर इंजिनियर संतोष होले रा.जाधववाडी, चीफ इंजिनियर महादेव भंडारे रा.कराड, सिनिअर इंजिनिअर संजय मुळे रा.उंबरे ता.पंढरपूर यांच्याशी संगनमत करून हि फसवणूक केल्याची तक्रार पोलीसांत देण्यात आली.

कंपनीमधील इंजिनिअर्सना पैशाचे आमिष दाखवून नवीन काम न करता पूर्वीच असणाऱ्या मशिनरी व साहित्य पॅनल बॉक्स पाईप हे सर्व नवीन टाकले आहेत, तसेच नवीन काम केले असे भासवुन कंपनीत खोटी बिले तयार केली. ती बिले सादर करून कंपनीकडून वेळोवेळी रक्कम घेऊन, एकूण १ कोटी १४ लाख ९० हजार ३५८ रुपयांची आर्थिक फसवणूक केली म्हणून वरील पाच जणांच्या विरोधात अविनाश भापकर रा.आसू तालुका फलटण, सातारा यांनी लोणंद पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार लोणंद पोलीसांत फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे . पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम करीत आहेत .

न्यूज अनकट प्रतिनिधी : आनंद पवार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा