केंद्राच्या कचरामुक्त शहर स्पर्धेत लोणावळा शहराला थ्री स्टार मानांकन

पुणे, दि.२३ मे २०२०: केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या कचरा मुक्त शहर स्पर्धेत लोणावळा शहराला केंद्राकडून थ्री स्टार मानांकन देण्यात आले आहे. अशी माहिती लोणावळा नगरपरिषद प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

केंद्र सरकारकडून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत देशभरातून अवघ्या १४३५ शहरांनी सहभाग घेतला होता.त्यापैकी फक्त १४१ शहरानांच हे नामांकन प्राप्त झाले आहे.

या स्पर्धेत देशातील सहा शहरांना ५ स्टार, ६४ शहरांना ३ स्टार, आणि ७१ शहरांना वन स्टार मानांकन प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रातील ३४ शहरांना थ्री स्टार मानांकन प्राप्त झाले आहे.

याबाबत माहिती देताना मुख्याधिकारी सचिन पवार यांनी सांगितले की, लोणावळा शहराने स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सलग २ वर्षे थ्री स्टार मानांकनाचा दर्जा कायम राखला आहे. लोणावळा शहरात मागील चार वर्षापासून स्वच्छतेबाबत विशेष काळजी घेण्यात येत आहे. यात शहरातील सर्व परिसरात घंटागाडीच्या माध्यमातून कचरा गोळा करणे, कचरा विलर्गीकरण, संपुर्ण शहर कचरा कुंडीमुक्त केल्याने आज कोरोनासारख्या महामारीच्या काळात लोणावळा शहर कोरोना व संसर्गरोगमुक्त राहिले असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. भविष्यात देखील स्पर्धा असो वा नसो लोणावळा शहराला कायम स्वच्छ व कचरामुक्त ठेवण्याचा संकल्प लोणावळा नगरपरिषदेने केला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा