पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

महामोर्चासाठी मुंबईला जाणारी कार्यकर्त्यांची वाहनं आणि वीकएंडला लोणावळा जाणाऱ्या पर्यटकांमुळे वाहतूककोंडी

पुणे, १७ डिसेंबर २०२२ : पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. आज महाविकास आघाडीतर्फे मुंबईत महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महामोर्चात सहभागी होण्यासाठी शेकडो कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहेत. तर दुसरीकडे वीकएंडमुळे मुंबईकर पर्यटनासाठी मुंबईबाहेर जात असल्यानं ही वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाका येथे वाहनांची प्रचंड गर्दी झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या कार्यकर्त्यांची वाहनं आणि वीकएंडसाठी लोणावळ्याला जाणाऱ्या पर्यटकांमुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे.

आज महाविकास आघाडीतर्फे मुंबईत महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी शेकडो कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. अनेकजण मुंबईच्या दिशेन येत आहेत. मुंबईत दाखल होत असलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीचा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे.

दुसरीकडे खालापूर टोलनाका परिसरातही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. खालापूर टोलनाक्याकडून मुंबईकडे येणाऱ्या महामार्गावर अंदाजे एक किलोमीटर अतंरापर्यंत, तर पुणेकडे जाणाऱ्या महामार्गावर पाचशे मीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. महाविकास आघाडीचा मोर्चा, वीकएंडसाठी शहराबाहेर जाणारे नागरिक आणि जड वाहनांमुळे ही वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा