इंदापूर, दि.२८ मे २०२०: इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथे गुरुवारी ग्रामपंचायतीच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे १०१ किटचे वाटप राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भरणे म्हणाले की ,गावामध्ये एवढी लोकसंख्या असताना देखील लोणी देवकर ग्रामपंचायतीने केलेल्या काटेकोर अंमलबजावणीमुळे एकही कोरणा रुग्ण ध अद्याप तरी सापडला नाही. तसेच ग्रामपंचायतीने आतापर्यंत अडीच टन धान्य धान्य वाटप केले असेल लाभदायी सरपंच प्रत्येक गावाला लाभावे. तसेच नागरीकानी आतापर्यंत जसे प्रशासनाला सहकार्य केले. तसेच यापुढे देखील करावे असे भरणे यावेळी म्हणाले.
याप्रसंगी ग्रामपंचायत सरपंच अमोल तोरवे, उपसरपंच दत्तात्रेय राखुंडे,ग्रामसेवक तुकाराम शिंदे, रामदास डोंगरे, भीमराव डोंगरे, रूपचंद तोंडे ,अमोल तोंडे ,अनिल तोंडे ,विलास तोरवे,दादा डोंगरे आणि महेंद्र गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे