लोणी काळभोर गुन्हे शोध पथकाने गावठी दारू व वाहन केले जप्त

लोणी काळभोर, दि.१४ मे २०२०: कुंजीरवाडी वरून लोणी काळभोर गावाकडे रायवाडी कॅनलच्या कच्च्या रस्त्याने एक मारुती ८०० चार चाकी वाहन बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारू तयार करून घेऊन जात आहे. अशी माहिती गुन्हे शोध पथकाला मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर यांनी सापळा रचून तो माल जप्त करण्यात आला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,
रायवाडी कॅनल रोडने गुरुवारी(दि.१४) रोजी रात्री एकच्या सुमारास एका गाडीच्या लाईटचा प्रखर उजेड पडला. कुंजीरवाडी बाजूकडून एम. एच.१२ पी. ए. ७८२५ मारुती ८०० पांढर्‍या रंगाची गाडी लोणी काळभोर गुन्हे शोध पथकाला येताना दिसली. त्या गाडीवर पोलिसांनी छापा टाकून २१० लिटर तयार दारू पकडली.

चालकाचे नाव लखन मुकिंदा पवार, रा, बघाटे वस्ती रोड उरुळी कांचन व तसेच हातभट्टीचे सहा काळे कैन्ट व एक निळे कँट व गाडीसह एकूण नऊ हजारांचा मुद्देमाल गुरुवारी रात्री दोनच्या सुमारास गुन्हे शोध पथकाने जागीच जप्त केला.

लॉकडाऊन असताना सार्वजनिक ठिकाणी अत्यावश्यक नसताना कामाव्यतिरिक्त फिरणे व सार्वजनिक वाहतूक अत्यावश्यक सेवा वगळून व कोरोना संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंधाबाबत प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन करून काही कारण नसताना वरील आरोपी गुन्हा करताना आढळला आहे. व आरोपींनी स्वतःच्या सुरक्षेची काहीही काळजी न घेतलेल्या स्थितीत आढळला असता त्याच्या विरुद्ध कलम १८८, २६९, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर यांनी “न्यूज अनकट” शी बोलताना सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा