कंगनाच्या हातात ‘कमळाचं’ फूल…

मुंबई, १४ सप्टेंबर २०२० : अभिनेत्री कंगना रनौतनं रविवारी संध्याकाळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. तिच्या कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेनं बुलडोजरने नुकत्याच केलेल्या कारवाईनंतर तिनं राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर कंगना रनौतनं माध्यमांना सांगितलं की ते (राज्यपाल) येथील पालक आहेत. माझा राजकारणाशी काही संबंध नाही. माझ्यावर अत्याचार झाले आहेत. राज्यपालांनी माझं मुलीसारखं ऐकलं. माझा विश्वास आहे की मला न्याय मिळेल. मात्र या सगळ्या घडामोडींमध्ये एक वैशिष्ट्य दिसून आलं, ते म्हणजे कंगना बाहेर पडली तेव्हा तिच्या हातात कमळाचं फूल दिसून आलं.

अलीकडील घडामोडींवरून अशी अटकळ बांधली जात आहे की कंगना रनौतचा कल भारतीय जनता पक्षाकडं दिसतोय. रविवारी कंगना कोश्यारी यांना भेटायला आली असता, तिच्या हातात दोन कमळांची फुलं दिसली. यामुळं कंगना राणौत ‘कमळ’ धारण करू शकते या कयासांना आणखी बळ मिळतं. अलीकडेच कंगना राणौतच्या आईनेही सांगितलं की त्यांचे कुटुंब पूर्वी काँग्रेसचे सदस्य होते पण, अलीकडील घटनेनंतर त्यांचे कुटुंब भाजपला पाठिंबा देईल.

कंगना रणौतचा कल भाजपाकडे असू शकतो, याची इतर बरीच चिन्ह आहेत. अलीकडच, केंद्र सरकारनं तिच्या सुरक्षेकडं एक मोठे पाऊल उचललं आणि तिला व्हाय प्लस लेव्हलची सुरक्षा प्रदान केली. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या वक्तव्यांनी कंगनाला भाजपचा पूर्ण पाठिंबा असल्याचंही सूचित केलं आहे.

केंद्रीय मंत्री आणि आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांनी शुक्रवारी कंगनावर अन्याय झाल्याचं सांगितलं आणि महाराष्ट्र सरकारनं सूड उगवुन हे कृत्य केल्याचं म्हटलं. कंगनाच्या झालेल्या नुकसानीची भरपाई करावी असं देखील रामदास आठवले म्हणाले. जर कंगना आमच्या (आरपीआय) पक्षात आली तर तिला फारसा फायदा होणार नाही, परंतु जर ती भाजपमध्ये सामील झाली तर तिला राजसभेची जागा मिळू शकेल, असा त्यांनी स्पष्ट इशारा देखील दिला.

कंगना आणि तिची बहिण रंगोली रविवारी राजभवनत भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वीच बीएमसीनं कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली. कंगनाच्या कार्यालयाचा काही भाग बेकायदेशीर बांधकाम होता, जो बीएमसीनं पडला. नंतर हे प्रकरण न्यायालयात गेलं जेथे मुंबई उच्च न्यायालयानं बीएमसीच्या कारवाईला स्थगिती दिली. या घटनेनंतर कंगना आणि शिवसेना यांच्यात चांगलीच जुंपली आहे. मात्र, भारतीय जनता पक्षही कंगनाच्या समर्थनार्थ पुढं आला असून बीएमसीच्या कारवाईला एकतर्फी म्हटलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा