प्रेम म्हणजे प्रेम असत, तुमच आमच अगदी ‘सेम’ असत, या कवितेने तरुणांना भुरळ पडते. अशाच एकापेक्षा एक सुप्रसिद्ध गाण्यांचे गीतकार जेष्ठ कवी मंगेश केशव पाडगावकर यांचा आज जन्मदिवस. त्यांनी केलेल्या कवितांचे आजही चाहते कमी नाहीत. त्यांचे लिखानावरील प्रेम आणि आदर याची पावती सांगून जातो.
मंगेश पाडगावकर यांचा जन्म १० मार्च १९२९ मध्ये कोकणातील वेंगुर्ले गावात झाला. मुंबई विद्यापीठातून एम.ए. पदवी पूर्ण केल्यानंतर ते रुईया महाविद्यालयात मराठी विषय शिकवत होते. त्यानंतर त्यांनी साप्ताहिकात ‘सहसंपादक’ म्हणूनही काम केले. तसेच युसीसमधेही त्यांनी मराठी विभागाचे प्रमुख संपादक म्हणून काही वर्षे काम केले. त्यानंतर १९८९ मध्ये ते सेवानिवृत्त झाले.आधीच्या काळात पाडगावकर यांच्यावर जेष्ठ कवी बा. भ. बोरकर यांचा प्रभाव होता. त्यानंतर त्यांनी स्वतंत्र लेखन केले.
१९८० मध्ये ‘सलाम’ या कविता संग्रहाला ‘साहित्य अकादमीचा पुरस्कार’ मिळाला होता. याशिवाय जिप्सी, छोरी, उत्सव, विदुषक, असे अनेक काव्यसंग्रह प्रकाशित झाली आहेत. पाडगावकर यांनी ’बायबल’ या ग्रंथाचा मराठी अनुवादही केला होता.
सत्तेच्या जगात वावरणाऱ्या सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रात कलाकारांचा केलेला मानभंग, आणि सर्वसामान्यांच्या मनात असलेली लाचारी, यामुळे पाडगावकर यांच्या मनात प्रचंड संताप होता, हा संताप त्यांनी आपल्या काव्यसंग्रह, कवितांमधून व्यक्त केला आहे.
पाडगावकरांना २००८ साली राज्य सरकारचा ‘महाराष्ट्र भूषण’ तर २०१३ साली ‘पदमभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दुबई येथे झालेल्या दुसऱ्या मराठी साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपदही भूषविले होते.
मुंबई येथील ३० डिसेंबर २०१५ रोजी राहत्या घरी मंगेश पाडगावकरांनी अखेरचा श्वास घेतला. पाडगावकरांच्या जाण्याने मराठी साहित्य वर्तुळ तीव्र शोक व्यक्त केला. गेल्या ७० वर्षांत त्यांनी अनेक काव्यसंग्रह, कविता लिहिल्या.