लुधियाना बॉम्बस्फोट प्रकरण : दहशतवादी हरप्रीत सिंहला मलेशियातून अटक

नवी दिल्ली, २ डिसेंबर २०२२ राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) फरार दहशतवादी हरप्रीत सिंह याला मलेशियातील क्वालालंपूर येथून अटक केली आहे. एनआयएने सांगितले की, पाकिस्तान स्थित इंटरनॅशनल शीख युथ फेडरेशन (ISYF) चा प्रमुख हरप्रीत हा लखबीर सिंह रोडेचा सहकारी आहे. २०२१ मध्ये लुधियाना कोर्ट बिल्डिंग बॉम्बस्फोटातील तो मास्टरमाइंड होता. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला होता, ६ जण जखमी झाले होते.

एनआयएच्या म्हणण्यानुसार, रोडेच्या सूचनेनुसार हरप्रीतने खास बनवलेल्या आयईडीच्या डिलिव्हरीमध्ये मदत केली होती, जो पाकिस्तानमधून भारतात त्याच्या साथीदारांना पाठवण्यात आला होता. लुधियाना कोर्ट कॉम्प्लेक्स बॉम्बस्फोटात त्याचा वापर करण्यात आला होता. अटक करण्यात आलेला आरोपी हरप्रीत सिंह हा देखील स्फोटके, शस्त्रास्त्रे आणि अंमली पदार्थांच्या तस्करीसह अनेक गुन्ह्यांमध्ये सामील होता.

यापूर्वी, एनआयएने वाँटेड दहशतवादी हरप्रीत सिंह ऊर्फ ​​हॅप्पीवर १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते, ज्यांच्या विरोधात विशेष एनआयए न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंटसह लूक आउट परिपत्रकदेखील जारी करण्यात आले होते.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा