पाचोरा-जळगाव राष्ट्रीय महामार्गावर लक्झरी बसला अपघात, २३ जण जखमी

जळगाव २ ऑगस्ट २०२४ : पाचोरा-जळगाव राष्ट्रीय महामार्ग ७५३ वर वावडदा ते वडली दरम्यान काल लक्झरी बसला अपघात झाला. या अपघातात २३ जण जखमी झाले असून त्यांना जळगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या रस्त्याचे बऱ्याच ठिकाणी वळणरस्त्यांवर विस्तारीकरण व कॉक्रिटीकरणाचे काम अपूर्णावस्थेत आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळेच हा अपघात झाल्याची माहिती समोर येतेय. वावडदा, वडली, पाथरी, सामनेर आदी ठिकाणी वळण रस्ते अत्यंत धोकादायक असून हस्तांतरण व मोबदल्या अभावी वळण रस्त्यांचे तसेच मोरी पूलांचे देखील काम अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे रस्ता बऱ्याच ठिकाणी उंच सखल आहे. जानेवारी २०२४ मध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर या अपूर्ण कॉक्रिटीकरणाला डांबरीकरणाचा जोड देउन रस्ते काम पूर्ण करण्यात आले आहे.

जळगाव पाचोरा रस्ता पुढे थेट मनमाडपर्यंत काँक्रिटीकरण विस्तारीकरणांतर्गत तयार करण्यात आला आहे. या रस्त्यांवर जळगाव पाचोरा तसेच भडगाव दरम्यान अनेक ठिकाणी अवघड वळणे असून कामे अपूर्ण आहेत. या वळणांवर गतीरोधक नसल्याने तसेच चिंचोळया वाटेमुळे वाहने भरवेगात येत असल्याने अचानक समोरासमोर येवून अपघात होत आहेत. रस्ते परिवहन विभागाने अपघात संभव ठिकाणी मोठे बोर्ड लावावेत तसेच अवघड वळणे काढून उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.

न्युज अनकट प्रतिनीधी : पंकज पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा