माढा २० ऑगस्ट २०२० : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असताना राज्य सरकार कोणतेही निर्णय घेण्यास तयार नाही केवळ चालढकलीचे धोरण त्यांनी अवलंबिले आहे या कठीण परिस्थितीत भाजप-महायुती पूर्ण ताकदीनिशी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी असून त्यांना न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही.
दूध उत्पादक शेतकरी संकटात असताना दूध दरवाढीबाबत आघाडी सरकार गंभीर नाही त्याचाच भाग म्हणून मातोश्रीवर पोस्टकार्ड पाठविण्याचा शुभारंभ काल दिनांक १९ ऑगस्ट २०२० रोजी माढा तालुका भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या वतीने माननीय चंद्रकांत दादा पाटील प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टी व माननीय श्रीकांत दादा देशमुख जिल्हाध्यक्ष सोलापूर यांच्या मार्गदर्शनाने माढा तालुका सरचिटणीस योगेश बोबडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
दूध दरवाढीसाठी भाजपने तिसऱ्या टप्प्यातील आंदोलनाला सुरुवात केली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पोस्टकार्ड ई-मेल, ट्विटर, फेसबूक, व्हॉट्सऍप आदींच्या माध्यमातून दूध दरवाढ मागणी व दूध भुकटी अनुदान मागणी यासाठी पत्रे व निवेदने पाठविण्यात येणार आहेत. हे आंदोलन भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
यावेळी योगेश बोबडे- सरचिटणीस माढा तालुका, जयसिंग अप्पा ढवळे – माजी अध्यक्ष युवा मोर्चा, गिरीश ताबे – शहराध्यक्ष युवा मोर्चा, बाळासाहेब ढगे – माजी सरचिटणीस माढा तालुका, हरी सटाले – ग्रामपंचायत सदस्य, भाऊसाहेब महाडिक- ग्रामपंचायत सदस्य तसेच शेतकरी उमेश ताबे, धनाजी भरगंडे, गणेश भरगंडे, संजय भरगंडे, ईश्वर साळुंखे, दत्तात्रेय पोटरे, गणेश कोरडे, प्रमोद देशमुख, गणेश देशमुख, प्रभाकर देशमुख, धनंजय देशमुख, सोमनाथ भरगुडे, पांडुरंग देशमुख, प्रमोद शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दूध दरवाढ मागणीचे पत्र लिहून पोस्टाद्वारे पाठविण्यात आले.
न्यूज अनकट प्रतिनिधी-प्रदीप पाटील.