माढा मध्ये पंतप्रधानांच्या पत्रवाटप कार्यक्रमाचा शुभारंभ

माढा, दि. १६ जून २०२०: मोदी सरकार-२ च्या प्रथमवर्ष वचनपुर्ती अभियाना अंतर्गत भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशातील एक कोटी कुटुंबापर्यंत पोहचण्यासाठी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला उद्देशुन लिहलेले पत्र सरकारच्या निर्णयाची आणि कार्याची माहिती जनसामान्यांत पोहचवण्यासाठी लोकसहभाग वाढवाण्याचा संकल्प हाती घेण्यात आलेला आहे.

व्यक्तीगत संर्पका अंतर्गत पंतप्रधानांचे पत्र जनतेपर्यंत पोहचवण्याच्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील टेंभुर्णी, बेंबळे, सापटणे, चव्हाणवाडी, पालवण, नगोर्ली या गावांना खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे शुभहस्ते टेंभुर्णी येथे पत्रवाटप करण्यात करण्यात आले.

माढा तालुक्यातील २७ हजार कुटुंबापर्यंत हे पत्र पोहचवण्यासाठी माढा मतदार संघाचे संयोजक रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मिटींग घेवून नियोजन केले असून आज प्रातिनिधीक स्वरुपात माननिय खा.रणजितदादा नाईक निंबाळकर यांचे शुभहस्ते हा पत्रवाटप शुभारंभ पार पडला.

यावेळी तालुक्यातील जेष्ठ नेते कृष्णात बोबडे, भाजपचे तालुका अध्यक्ष संजय टोणपे, भारत नाना पाटील, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश बोबडे व कार्यकर्ते उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी- प्रदिप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा