माढा तहसील कार्यालयावर “ढोल बजावो सरकार जगावो” आंदोलन

माढा २५ सप्टेंबर २०२० : धनगर समाजास अनुसूचित जाती जमाती मधील आरक्षण लागू करावे,मुंबई उच्च न्यायालयात धनगर समाजाच्या वतीने दाखल याचिकेची सुनावणी जलदगती न्यायालयात व्हावी,मागील सरकारने धनगर समाजासाठी जाहीर केलेल्या आदिवासींच्या सवलती त्वरित लागू करून त्यासाठी एक हजार कोटी रुपयांच्या निधीची तात्काळ तरतूद करावी, धनगर समाजातील मेंढपाळांवर होणारे हल्ले थांबून कडक कारवाई करावी व त्यांना संरक्षण द्यावे. या मागण्यांसाठी माढा तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने माढा तहसील कार्यालयावर ‘ढोल बजाओ सरकार जगाओ’ धडक मोर्चा काढण्यात आला.

ढोल वाजवून समाजाच्यावतीने सरकारविरुद्ध आक्रोश आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला. सरकारच्या उदासीनतेमुळे धनगर समाज अनेक योजनांपासून वंचित राहत आहे. या मागण्यांची पूर्तता न केली गेल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या धनगर समाजाच्या अनेक प्रश्नांसाठी माढा तहसील कार्यालयावर ढोल बजावो सरकार जगावो आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार राजेश चव्हाण यांनी आंदोलनकर्त्यांना भेटून निवेदन स्वीकारले.

यावेळी किशोर बापू सलगर, रामभाऊ टकले, निवृत्ती तांबवे,किसन देवकते, राजेंद्र दडस,निलेश बंडगर, शिवाजीराव पारेकर, संजय गायकवाड, समीर सापटणेकर,गणेश शेंडगे, सत्यवान पांढरे, नवनाथ करगळ, वसंत देवकाते, वासुदेव चोरमले, नवनाथ बिचकुले, मयुर खरात, गोवर्धन नाईकवाडे, शिवाजी पाटील, रवींद्र शिंगाडे, गोरख वाकडे, रवी नाईकवाडे, भैया खरात, तन्मय देवकाते आदी व मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी-प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा